Advertisement

पाच वर्षांत मुंबई मलेरियामुक्त! पालिकेचे ‘मिशन ‘झीरो मलेरिया’

‘मलेरियामुक्त’ करण्यासाठी पालिकेनं ‘मिशन झीरो मलेरिया’ हाती घेतलं आहे.

पाच वर्षांत मुंबई मलेरियामुक्त! पालिकेचे ‘मिशन ‘झीरो मलेरिया’
SHARES

‘मलेरियामुक्त’ करण्यासाठी पालिकेनं ‘मिशन झीरो मलेरिया’ हाती घेतलं आहे. यामध्ये २०२७ पर्यंत मुंबईत मलेरियाचा एकही रुग्ण आढळणार नाही यासाठी राज्य सरकारच्या निर्देशानुसार ‘अॅक्शन प्लॅन’ तयार करण्यात येत आहे.

लवकरच मुंबईत पालिका रुग्णालये, दवाखाने, खासगी हॉस्पिटल्स-लॅबरोटरीजमध्ये आढळणाऱ्या प्रत्येक रुग्णाची नोंद एकाच ठिकाणी करून कार्यवाही करण्यात येणार आहे. यासाठी स्वतंत्र ई-मेल आयडी सुरू करण्यात येणार आहे.

सरकारनं अध्यादेश काढून मुंबई २०३० पर्यंत ‘झीरो मलेरिया’ करण्याचे निर्देश पालिकेला दिले आहेत. यानुसार पालिका पुढील पाच वर्षांतच मुंबई मलेरियामुक्त करण्यासाठी अॅक्शन प्लॅन तयार करीत आहे.

यानुसार रुग्णांची संख्या कमी करणे, जनजागृती करणे, चाचण्या करणे, उपचार व उपाययोजना करण्याचे नियोजन करण्यात येत आहे. २५ एप्रिलला जागतिक मलेरिया दिनाच्या पार्श्वभूमीवर पालिका ‘झीरो मलेरिया’ मोहीम राबवणार आहे.

मुंबईत दरवर्षी मलेरियाचे सुमारे पाच हजार रुग्ण आढळतात. २०१९ मध्ये मुंबईत मलेरियामुळे एकही मृत्यू झाला नाही, तर २०२० आणि २०२१ मध्ये मात्र प्रत्येकी एक मृत्यू झाला आहे.

मलेरिया डासांमुळे पसरणारा आजार आहे. प्लास्मोडियम नावाच्या परजीवीमुळे हा आजार होतो. या आजारात ताप, डोकेदुखी आणि उलटीसारखी फ्लूसदृश लक्षणे आढळतात. निदान झाल्यास आणि वेळेवर उपचार केल्यास हा रोग पूर्णपणे बरा होतो. रोगनिदान आणि उपचारांमध्ये उशीर झाल्यामुळे मात्र गंभीर गुंतागुंत होऊ शकते. यामुळे रुग्ण दगावण्याचीही शक्यता असते.



हेही वाचा

धारावीतल्या 'या' केंद्रावर सोमवारपासून विनामूल्य बूस्टर डोस

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा