Advertisement

गुड न्यूज! आता मुंबईकरांना 'या' केंद्रावर मोफत बुस्टर डोस मिळण्याची शक्यता

पालिकेनं १८-५९ वर्षे वयोगटातील लाभार्थ्यांना विनामूल्य बूस्टर डोस देण्यास सुरुवात केली आहे.

गुड न्यूज! आता मुंबईकरांना 'या' केंद्रावर मोफत बुस्टर डोस मिळण्याची शक्यता
(Representational Image)
SHARES

बृहन्मुंबई महानगरपालिकेनं (BMC) नुकतंच बुस्टर डोस विनामुल्य देणार असल्याचं म्हटलं होतं. त्यानुसार पालिकेनं शहरातील १८-५९ वर्षे वयोगटातील लाभार्थ्यांना विनाखर्च बूस्टर डोस देण्यास सुरुवात केली आहे.

धारावीतील COVID-19 लसीकरण केंद्र (CVC) हे मोफत बूस्टर डोस देण्यास सुरुवात करणारे पहिले आणि एकमेव लसीकरण केंद्र बनले आहे.

कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (CSR) उपक्रमांतर्गत, जसलोक हॉस्पिटलने धारावीतील शास्त्रीनगर-2 CVC इथं मोफत लस पुरवण्यासाठी हा उपक्रम सुरू केला. इथं चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर, पालिका अधिकाऱ्यांनी इतर खाजगी रुग्णालयांनाही त्यांच्या CSR उपक्रमांतर्गत त्यांच्याशी हातमिळवणी करण्याची विनंती केली आहे.

बॉम्बे हॉस्पिटल, सुराणा हॉस्पिटल यासारख्या इतर रुग्णालयांनीही या उपक्रमात सहभागी होण्यासाठी स्वारस्य दाखवलं आहे. अधिका-यांनी सांगितलं की, आणखी काही रुग्णालये लवकरच सहकार्य करतील अशी त्यांची अपेक्षा आहे.

जसलोक हॉस्पिटलला विशेषत: धारावीमध्ये हा उपक्रम सुरू करायचा होता, तर इतर रुग्णालये त्यांचा उपक्रम अशा केंद्रांमध्ये सुरू करू इच्छितात ज्यात मोठ्या प्रमाणात लाभार्थी आहेत, अधिकाऱ्याने पुढे सांगितले.

हे समोर आलं आहे की, लसी वाया घालवण्याऐवजी, खाजगी रुग्णालयांनी सरकारी सीव्हीसीमध्ये बूस्टर डोससाठी पात्र असलेल्या गरजू लाभार्थ्यांना मोफत डोस देण्याचा उपक्रम सुरू केला आहे. कोवॅक्सिन लसीच्या तुलनेत अनेक खाजगी रुग्णालयांमध्ये कोविशील्ड लसीचा मोठा साठा आहे.

आरोग्य मंत्रालयानं मंजुरी दिल्यानंतर सर्व प्रौढांसाठी बूस्टर डोस १० एप्रिलपासून खाजगी रुग्णालयांमध्ये उपलब्ध आहेत.



हेही वाचा

६ ते १२ वयोगटातील मुलांचं 'या' तारखेपासून होणार लसीकरण

मॉल्स, सिनेमा हॉलमध्ये मास्क बंधनकारक करण्याचा टास्क फोर्सचा सल्ला

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा