ढगाळ वातावरण वाढतंय; मुंबईकरांनो तब्येत सांभाळा!

  • मुंबई लाइव्ह टीम & भाग्यश्री भुवड
  • आरोग्य

सकाळी अचानक थंडी आणि दुपार झाली तरी वातावरणात आर्द्रता आणि प्रदूषित हवा...सध्या मुंबईची अशीच स्थिती झाली आहे. त्यामुळे मुंबईकरांनो तब्येत सांभाळा! हे धुरकट वातावरण आरोग्यासाठी हानिकारक असल्याचं 'सफर' या संस्थेने नमूद केलं आहे.

हवेचा दर्जा खालावला

मुंबईत गेल्या काही दिवसांपासून वातावरणात बदल होत आहेत. शिवाय, बुधवारी सकाळी मुंबईकरांना ढगाळ वातावरण अनुभवायला मिळालं. त्यामुळे वांद्रे-कुर्ला संकुल, बोरिवली, माझगाव, भांडुप परिसरात हवेचा दर्जा खालावल्याचं आढळून आलं.

आरोग्यासाठी हानिकारक वातावरण 

'सफर' या संस्थेने मंगळवारी नोंदवलेल्या आकडेवारीनुसार मुंबईतल्या बीकेसी, भांडुप, बोरिवली, माझगाव या भागातील हवेचा दर्जा निकृष्ट स्तरापर्यंत खालावला होता. मंगळवारी सर्वसाधारण हवेच्या प्रदूषणाचा मुंबईतील निर्देशांक २७१ होता. शिवाय, ही हवा आरोग्यासाठी हानिकारक असल्याचंही नमूद केलं गेलं.

तापमानाची टक्केवारी

बुधवारी सकाळी कुलाब्यात २३.४ अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदवण्यात आलं आहे. तर, सांताक्रूझ परिसरात २१.५ अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदवण्यात आलं आहे.

कुलाबा परिसरात बुधवारी सकाळी ८.३० पर्यंत ८८ टक्के आणि दुपारपर्यंत ७५ टक्के आर्द्रता नोंदवण्यात आली आहे. तर, सांताक्रूझ परिसरात सकाळी ६९ टक्के आणि दुपारी ४७ टक्के आर्द्रता नोंदवण्यात आल्याची माहिती कुलाबा वेधशाळेकडून देण्यात आली आहे.

आरोग्य सांभाळा!

सतत बदलत असलेल्या आर्द्रतेमुळे वातावरणात विषाणूंचा संंसर्ग वाढतो. त्यामुळे, दमा, सर्दी, ताप, श्वसनविकार घसादुखीसारख्या समस्यांचं प्रमाण वाढल्याचं दिसून आलं आहे.


हेही वाचा

दूषित पाण्यामुळे होणाऱ्या आजारांपासून बचावासाठी 'हे' करा

पुढील बातमी
इतर बातम्या