Advertisement

दूषित पाण्यामुळे होणाऱ्या आजारांपासून बचावासाठी 'हे' करा


दूषित पाण्यामुळे होणाऱ्या आजारांपासून बचावासाठी 'हे' करा
SHARES

मुंबईत 29 ऑगस्टला झालेल्या मुसळधार पावसामुळे सर्वत्र पाणी तुंबले होते. त्यामुळे मुंबईतला पाणीपुरवठा करणाऱ्या अनेक पाईपलाईन्स पाण्याखाली गेल्या. त्यातून मुंबईतील बऱ्याच ठिकाणी अजूनही दूषित पाणीपुरवठा होत असल्याची तक्रार केली जात आहे. वांद्रे, चर्चगेट परिसरात मेट्रोमुळे दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्याची तक्रार सध्या तेथील नागरिक करत आहेत.

वांद्रे, चर्चगेट परिसरातील नागरिक उलट्या, जुलाब, गॅस्ट्रो या आजाराने त्रस्त झाले आहेत. या परिसरात दूषित पाणी पुरवल्यामुळेच हा आजार पसरला असल्याचे तिथल्या स्थानिकांचे म्हणणे आहे. हे पाणी प्यायल्यानंतर जवळपास पाच तासांनंतर अशा आजारांची लक्षणे दिसून आल्याचे तिथल्या नागरिकांचे म्हणणे आहे.


दूषित पाण्यामुळे 'हे' आजार होऊ शकतात...

दूषित पाण्यात असलेल्या विषाणूंमुळे पोटाचे विकार होऊ शकतात. पोटात दुखणं, सतत जुलाब, उलटी झाल्यामुळे तीन-चार दिवसांत तापही येतो. अनेकदा अँटिबायोटिक्स देऊनही रुग्णाला बरं वाटत नाही. याशिवाय, दूषित पाण्यामुळे कावीळसारखा आजारही होऊ शकतो. उल्टी, जुलाब झाल्यामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते. त्यामुळे रुग्णाला रुग्णालयात दाखल करण्याचीही वेळ येऊ शकते. दूषित पाणी प्यायल्यानंतर सात ते आठ दिवसात उलट्या, ताप, लघवी पिवळी होणे किंवा भूक मंदावणे ही लक्षणे आढळून येतात.

कावीळ झालेल्या रुग्णांमध्ये हेपेटायटिस 'ए' किंवा 'इ' हे प्रकार मोठ्या प्रमाणात आढळतात. चार ते पाच दिवसांनी डोळे पिवळे दिसायला लागतात. महिना ते दीड महिन्यापर्यंत या आजाराची लक्षणे रुग्णांमध्ये कायम राहतात. 90 ते 95 टक्के नागरिकांमध्ये हा आजार दिसून येतो. उपचार न घेतल्यास टायफॉइडचे जंतू रक्तात मिसळतात.


काय कराल उपचार ?

  • पावसाळ्यात पाणी उकळून प्यावे
  • मेडिक्लोर ड्रॉप्स पाण्यात टाकल्यानंतर ते प्यावे
  • त्यामुळे पाण्यात साचलेली माती अथवा गाळ हा तळाशी जाऊन आपल्याला स्वच्छ पाणी मिळते
  • उलट्या, जुलाबामुळे शरीरातील पाणी कमी होते. त्यावेळी मीठ - साखर घातलेले पाणी सतत पीत राहावे
  • ओआरएस पाण्यात मिसळून प्यावी
  • टेट्रा पॅक्स देखील फायदेशीर ठरतील
  • नारळाचे पाणी प्यावे. मात्र, ग्लुकॉन डी अथवा कोल्ड्रिंक्स घेणे टाळावे

ज्या भागात दूषित पाण्याचा पुरवठा होत असेल, त्या विभागातील नागरिकांनी पालिकेच्या वॉर्ड ऑफिसमध्ये जाऊन तक्रार नोंदवावी. जर पालिकेच्या दुरुस्तीच्या कामामुळे दूषित पाण्याचा पुरवठा होत असेल आणि दुरुस्ती करण्यासाठी उशीर होत असेल, तर गरज असल्यास पाण्याचा टँकर देखील दिला जातो. शिवाय, जर डोळ्यांना पाण्याचा रंग वेगळा जाणवला तर तात्काळ तक्रार दाखल करावी. जेणेकरून, असिस्टंट इंजिनिअर त्या परिसरात जाऊन त्याची पडताळणी करू शकतील.

पद्मजा केसकर, मुख्य कार्यकारी अधिकारी, महापालिका



हेही वाचा - 

कावीळ झाल्यास अशी घ्या काळजी...

वळणाई वसाहतीत दूषित पाणीपुरवठा


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा