Advertisement

व्हायरल फिव्हरपासून वाचण्यासाठी ... हे उपाय करा


व्हायरल फिव्हरपासून वाचण्यासाठी ... हे उपाय करा
SHARES

हवामानात होणाऱ्या सततच्या बदलामुळे सध्या आजारांचं प्रमाण वाढलं आहे. कधी ऊन, कधी पाऊस असं वातावरण असल्याने सर्दी, ताप, डोकेदुखी, खोकला, गळा दुखणे-खवखवणे, उलट्या, जुलाब अशा आजारांनी डोके वर काढले आहे. पण, तुमची रोगप्रतिकार शक्ती चांगली असेल, तर व्हायरल म्हणजेच हवेतील विषाणूंपासून पसरणाऱ्या आजारांवर ताबा मिळवू शकता. त्यासाठी तुम्हाला हे उपाय करणे गरजेचे आहे.

वातावरणातील बदलामुळे अचानक थंडी भरल्यासारखे वाटते, डोळे लाल होतात, अचानक अंगातून घामाच्या धारा वाहू लागतात. ही सगळी व्हायरल फिव्हरची लक्षणे आहेत. ही लक्षणे दिसू लागल्यास त्वरीत डॉक्टरांकडे जावे. व्हायरल फिव्हर झाल्यांनतर थोडे दिवस बरे वाटेलही; पण पुन्हा तोच त्रास सुरू होऊ शकतो. हवेतील विषाणू तुमची रोगप्रतिकार शक्ती कमी करण्याचा प्रयत्न करत असतात. 


रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी हे उपाय

  • तुळशीचा काढा प्या

एक लीटर पाण्यात एक चमचा लवंगाची पूड, २० कोवळी ताजी तुळशीची पाने टाकून ते पाणी उकळून घ्यावे. दर दोन तासांनी हा काढा प्यावा लगेच आराम मिळतो. हा काढा तापासाठी चांगला आहे.


  • आले, हळद, मधाचा काढा

अशक्तपणा आला असेल किंवा थकवा जाणवत असेल, तर अशावेळी एक लीटर पाण्यात मध्यम आकाराचा आल्याचा तुकडा आणि सुंठ टाकावी. या मिश्रणाला दोन उकळ्या आल्यानंतर यात अर्धा चमचा हळद पावडर, अर्धा चमचा काळी मिरी पावडर आणि मध टाकावे. दिवसभर थोडे थोडे पित राहावे.


  • धन्याचा चहा
    धन्यामध्ये अँटीबायोटीक्स असतात. एक लिटर पाण्यात धने टाकून उकळून घ्यावे. त्यानंतर त्यात थोडे दूध आणि साखर टाकून गरमागरम धन्याचा चहा प्यावा. घशाची खवखव कमी होते. खोकलाही नियंत्रणात येतो.


  • तांदळाची पेज
    तांदळाची पेज हा प्राचीन घरगुती उपचार आहे. जिरे आणि चवीपुरते मीठ टाकून आजारी व्यक्तीला ती पिण्यास द्यावी. अशक्तपणा कमी होतो.


  • मेथीचे पाणी

एक लीटर पाण्यात चार चमचे मेथीचे दाणे उकळून ते पाणी प्यावे. पोटाचे विकार गायब होतात.



हेही वाचा - 

तरुण वयातच सतावतेय केस गळतीची समस्या ?

शाकाहारी असाल तर भासेल जीवनसत्व बी १२ ची कमतरता



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा