Advertisement

तरुण वयातच सतावतेय केस गळतीची समस्या ?


तरुण वयातच सतावतेय केस गळतीची समस्या ?
SHARES

धावपळीच्या जीवनात सर्वांचंच आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष होतं. याचा परिणाम हळूहळू का होईना आपल्या शरीरावर होतो. त्यात सध्या तीव्रतेने भासणारी समस्या म्हणजे केस गळती. पण, यातही महिलांपेक्षा पुरुषांचं प्रमाण जास्त असल्याचं डॉक्टर सांगतात. आरोग्याकडे लक्ष न दिल्यामुळे त्याचा परिणाम आपल्या केसांवरही होत असतो, याबाबत तेवढी जनजागृती तरुणांमध्ये नाही. त्यामुळे कमी वयातच टक्कल पडण्याच्या किंवा केस पांढरे होण्याची तक्रारी वाढायला लागल्या आहेत.

मुंबईत सामान्यपणे २൦ ते ३൦ टक्के पुरुषांचे केस गळतात. पण, जनजागृती नसल्याने टक्कल पडतं आणि त्याचा परिणाम या पुरूषांच्या भविष्यावर होतो.


तरुण वयात टक्कल का पडतं ?

  • मानसिक ताणतणाव हे मुख्य कारण 
  • मनावर आणि शरीरावर ताण आल्याने लहान वयात केस पिकतात
  • शरीरातील हार्मोन्समध्ये बदल होणे
  • आहारात पौष्टिक द्रव्यं, कॅल्शियमचं प्रमाण कमी असणं
  • हेअर कलर्स, शॅम्पू, कंडिशनर, जेलचा अतिरिक्त वापर
  • हृदयविकार, थायरॉईड, डिप्रेशन इ. आजारांवरील गोळ्यांचा दुष्परिण
  • डोक्यात कोंडा झाल्याने केस गळतात 
  • अनुवांशिकता
  • झोपेच्या अनिश्चित वेळा
  • तंबाखू सेवन
  • धुम्रपान केल्याने शरीरातील ऑक्‍सिजनची पातळी कमी होणे
  • अतिप्रमाणात दारूचं सेवन केल्याने शरीरातील लोह, झिंक आणि पाण्याची पातळी कमी होऊन केस गळती 




याआधी महिलांमध्येच बहुतांश केसगळतीची समस्या असायची. पण, आता पुरुषांमध्येही ही समस्या दिसून येते. रूग्णालयात आठवड्याला १५० ते २०० रूग्ण उपचारांसाठी येतात. यातील १०० रूग्णांमध्ये तरूणांचा समावेश असतो. प्रामुख्याने १८ ते २५ वयोगटातील तरूणांचा यांत समावेश अाहे. इतकंच नाहीतर तर मुलांमध्ये केस पांढरे होण्याचंही प्रमाण वाढलंय. 

- चित्रा नाईक, त्वचारोगतज्ज्ञ, नायर रुग्णालय


केस गळती रोखण्यासाठी काय करावं ?

  • कॅल्शियमयुक्त पदार्थांचा आहारात समावेश करा 
  • केसांना खोबरेल तेल लावा
  • दररोज सकाळी कडीपत्त्याची १० पानं खावीत
  • केस गळती जास्त होत असल्यास वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या
  • आहारात फळांचा समावेश करा



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा