Advertisement

शाकाहारी असाल तर भासेल जीवनसत्व बी १२ ची कमतरता


शाकाहारी असाल तर भासेल जीवनसत्व बी १२ ची कमतरता
SHARES

मानवी शरीराला जगण्यासाठी प्रथमत: पौष्टिक आहाराची गरज असते. त्यातूनच तर आपल्या शरीरात प्रतिकारशक्ती निर्माण होते. त्यासाठी सर्वात महत्त्वाचं असतं ते म्हणजे जीवनसत्व... त्यांचेही विविध प्रकार आहेत. त्यात सर्वात महत्त्वाचं जीवनसत्व आहे, ‘जीवनसत्व बी १२’.

‘जीवनसत्व बी १२’ हे आपल्या शरीराला उर्जा देण्यासाठी मदत करतं. पण, आपण हे शरीरात तयार करु शकत नाही. त्यासाठी आपल्याला मांस, अंडी, कवचजन्य मासे अशा अनेक पदार्थांचा आहार घ्यावा लागतो. हे जीवनसत्वबराच काळ शरीरात साठवून ठेवता येत नसल्यानं ठराविक कालावधीनंतर बी १२ जीवनसत्वाचं समृद्ध आहाराद्वारे सेवन करावं.


का असते ‘जीवनसत्व बी 12’ ची गरज?

  • मानवी शरीराकरिता हे 'पॉवर हाऊस' असते
  • डीएनए, चेता पेशी आणि रक्त पेशींची निर्मिती करण्यास मदत करते
  • मेंदू, रोग प्रतिकार क्षमता आणि चयापचय अशा आरोग्य क्रियांमध्ये महत्त्वाची भूमिका  


काय सांगतो मेट्रोपोलीस हेल्थकेअरचा अहवाल?

मेट्रोपोलीस हेल्थकेअरच्या अहवालानुसार, १५ टक्क्यांहून अधिक भारतीय लोकसंख्येत ‘जीवनसत्व बी १२’ ची कमतरता असते. त्यापैकी बहुसंख्य शाकाहारी लोक असतात.

५० वर्षे वयोगटापेक्षा अधिक वयाच्या व्यक्ती सेलीयाकग्रस्त असतात किंवा त्यांना इतर पचनविषयक समस्या असतात. त्यामुळं ‘जीवनसत्व बी १२’ ची कमतरता बळावण्याची शक्यता अधिक असते.


‘जीवनसत्व बी १२’ च्या अभावाची कारणे:

  • अॅट्रोफिक गॅस्ट्राइटीसमुळे पोटातील अंतर्गत अस्तर पातळ होतं
  • गंभीरस्वरुपाच्या रक्ताक्षय, रोगप्रतिकारशक्तीशी संबंधीत आजार होतात
  • क्रोन’ज डीसीज, सेलीयाक डीसीज किंवा जीवाणूंची वाढ झाल्याने छोट्या आतड्याच्या सुरळीत कार्यवहनात अडथळा आल्याने जाणवणारा अशक्तपणा  


वाढत्या वयासोबत जीवनसत्व बी १२ शोषण्याची शरीराची शक्ती संपून जाते. एखाद्यानं वेट लॉस किंवा पोटाची इतर एखादी शस्त्रक्रिया केली असल्यास हे कठीण होतं. मद्यपान मोठ्या प्रमाणावर करत असल्यास किंवा बराच काळ अॅसीड कमी करणारे औषध घेत असल्यास जीवनसत्व बी १२ शोषण्यात शरीराला अडथळे येतात. जीवनसत्व बी १२ ची कमतरता शाकाहारी व्यक्तींमध्ये बहुतांशी पाहायला मिळते.

- डॉ. किर्ती चड्ढा, मेट्रोपोलीस हेल्थकेअर, ग्लोबल रेफरन्स लॅबोरेटरीच्या प्रमुख




तसंच महिलांच्या तुलनेत पुरुषांमध्ये 'जीवनसत्वबी १२' ची कमतरता अधिक असते. महिला वर्गपूरक आहार नीट घेत असल्यानं त्यांचं शरीर जीवनसत्व बी १२ ची पातळी राखून ठेऊ शकतं.


अशा प्रकरणात प्रतिबंधात्मक उपाय म्हणून योग्य अन्नपदार्थ आहारात समाविष्ट करावेत. गरजेनुसार पूरक आहार घ्यावा. एखाद्याला आपल्या शरीरातील बी १२ अभावाची तपासणी करायची असल्यास डॉक्टर सहज निदान करू शकतात. तसंच पूरक आहार किंवा इंजेक्शनदेखील सुचवतात. त्यामुळं एखाद्या व्यक्तीमध्ये जीवनसत्व बी १२ कमतरता धोका आणि संबंधीत लक्षणांची तपासणी सर्वसाधारण चिकित्सकाकडे करून घेणं उत्तम ठरते.


या जीवनसत्त्वांच्या सेवनाचं प्रमाण वयोमानानं वेगवेगळं असू शकतं. ते मायक्रोग्राममध्ये मोजतात.

●  अर्भक ते वयवर्ष ६ महिने : ०.४ एमसीजी

●  शिशू वयवर्ष  ७-१२ महिने : ०.५ एमसीजी

●  वय १-३ : ०.९ एमसीजी

●  वय ४-८ : १.२ एमसीजी

●  वय ९-१३ : १.८ एमसीजी

● किशोरवयीन वय १४-१८ : २.४ एमसीजी (गर्भवती असल्यास दरदिवशी २.६ एमसीजी आणि स्तनपान करत असल्यास दरदिवशी २.८ एमसीजी)

● प्रौढ (१८ आणि त्यावरील : २.४ एमसीजी (गर्भवती असल्यास दरदिवशी २.६ एमसीजी आणि स्तनपान करत असल्यास दरदिवशी २.८ एमसीजी)



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा