ओरलम - मालाड पश्चिमेकडील ओरलम येथील वॉर्ड क्रमांक 30 मधील वळणाई वसाहतीत दूषित पाणी पुरवठा केला जातोय. आठवड्याभरापासून दूषित पाण्याचा प्रश्न येथील नागरिकांना भेडसावतोय. त्यामुळं नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. तर काही जण पाणी विकत घेऊन पिण्यासाठी वापरत आहेत. पाण्याची जलवाहिनी कुठे तरी फुटण्याची शक्यता आहे त्यामुळे दूषित पाणी पुरवठा होत असल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे. याबाबत पी उत्तर पालिका जल विभागाकडे तक्रार करण्यात आलीय. लवकरच पाणी गळती कुठे होत आहे, याचा शोध घेण्यात येईल असं पी उत्तर पालिकेच्या जलविभागाकडून स्थानिकांना सांगण्यात आलंय.