Advertisement

महापालिकेचे लेप्टोस्पायरोसिससाठी आरोग्य सर्वेक्षण


महापालिकेचे लेप्टोस्पायरोसिससाठी आरोग्य सर्वेक्षण
SHARES

मंगळवारी 29 ऑगस्टला झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईत जनजीवन अक्षरश: ठप्प झाले होते. या पावसाची महापालिकेच्या आरोग्य विभागानेही धास्ती घेतली होती. रस्त्यांवर, रेल्वे रुळांवर तर अनेकांच्या घरात पावसाचे पाणी शिरले होते. त्यामुळे अडकलेले मुंबईकर त्याच पाण्यातून वाट काढत घरी जाण्याच्या प्रयत्नात होते.

जागोजागी साचलेल्या पावसाच्या पाण्यामुळे मुंबईकरांना साथीच्या आजारांचा सामना करावा लागू शकतो, अशी भीती व्यक्त करत मुंबई महापालिकेने 30 आणि 31 ऑगस्टला आरोग्य सर्वेक्षण केले.



3 हजार 678 नागरिकांना लाभ

महापालिका क्षेत्रात एकूण 28 आरोग्य शिबिरे राबवण्यात आली. त्यात 3 हजार 678 नागरिकांनी सहभाग घेतला. घरोघरी जाऊनही आरोग्यासंदर्भात सर्वेक्षण करण्यात आले. एकूण 36 हजार 202 नागरिकांवर 31 ऑगस्टपर्यंत प्रतिबंधात्मक औषधोपचार करण्यात आले.

ज्या व्यक्ती पुराच्या पाण्यातून एकदाच चालल्या आहेत, अशा व्यक्ती कमी जोखमीच्या आहेत. ज्यांच्या पायावर जखम झालेली किंवा पुराचे पाणी चुकून तोंडात गेले असेल, अशा व्यक्ती मध्यम जोखीमच्या आहेत. पाण्याशी ज्यांचा संपर्क अधिक वेळ आला असेल, ते लोक अतीजोखमीचे आहेत. लहान मुले, गर्भवती महिला यांच्या बाबतीत अधिक खबरदारी घेणे महत्त्वाचे आहे.

डॉ. पद्मजा केसकर, कार्यकारी आरोग्य अधिकारी, महापालिका


मुंबईला दूषित पाणीपुरवठा?

ज्यावेळी पाणी साचले, त्यावेळी मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईनही त्या पावसाच्या पाण्याखाली होत्या. त्यामुळे मुंबईला दूषित पाण्याचाही पुरवठा होऊ शकतो. त्यासाठी पालिकेच्या 3 हजार 200 आरोग्य कर्मचाऱ्यांना मुंबईतील वेगवेगळ्या भागात सर्वेक्षण करण्यास सांगितले होते. झोपडपट्टी आणि बैठ्या चाळीत हे सर्वेक्षण करण्यात आले. यात जवळपास 2 लाख 50 हजार घरांमध्ये जाऊन पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी सर्वेक्षण केले.



हेही वाचा - 

पावसात भिजलात? आरोग्याची काळजी घ्याच

पाऊस धो धो कोसळत होता आणि चोर चोरी करत होता!


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा