Advertisement

माटुंग्यातील कमला रामनमधील घरांमध्ये पाणी


माटुंग्यातील कमला रामनमधील घरांमध्ये पाणी
SHARES

माटुंगा रेल्वे स्थानक हा परिसर सखल असला तरी मागील दोन-चार वर्षात याठिकाणी पाणी साचण्याचे प्रमाण कमी झाले होते. परंतु, मंगळवारी मुसळधार पावसामुळे पश्चिम रेल्वेच्या माटुंगा स्थानकावरील रेल्वे रुळ पाण्याखाली गेले. या परिसरात असलेल्या कमला रामन वसाहतीतील लोकांच्या घरांमध्ये पाणी शिरले. त्यामुळे या वसाहतीतील अनेक घरांमधील सामानांचे मोठे नुकसान झाले.

माटुंगा पश्चिम रेल्वेच्या समोर असलेल्या कमलारामनगर वसाहतीतील घरांमध्ये दुपारी तीन वाजेपर्यंत अडीच फुटांएवढे पाणी साचले होते. या वसाहतीत सुमारे 350 कुटुंबे राहत असून या वसाहतीच्या शेजारून दादर-धारावी नाला वाहत असल्यामुळे हा नाला तुडुंब भरला. त्यामुळे स्थानिक रहिवाशांच्या घरांमध्ये पाणी शिरले. त्यामुळे येथील लोकांना आपला मुक्काम पोटमाळ्यांवर हलवाला लागला. सर्व साहित्य टेबल किंवा ओट्यावर उचलून ठेवावे लागले. परंतु, हे सामान उंचावर ठेवूनही पाण्याची पातळी वाढल्यामुळे सामान मोठ्याप्रमाणात भिजले गेले असून अनेक सामानांची नासधुस झाली असल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे.

या वसाहतील पूर्वीपासूनच पाणी भरत आहे. परंतु, गेल्या काही वर्षांमध्ये पाणी भरण्याचे प्रमाण कमी झाले होते. परंतु, यंदा मोठ्याप्रमाणात पाणी भरले असल्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय वांद्र्यातील जयभारत सोसायटीमध्येही लोकांच्या घरांमध्ये पाणी तुंबल्याची घटना घडली आहे. अनेक रस्त्यांवर पाणी तुंबल्यामुळे पदपथावर लोकांनाही आपले संसार सुरक्षित ठिकाणी हलवावे लागले होते.


चिंचपोकळीतही तुंबले पाणी

चिंचपोकळी पश्चिम भागांमध्ये अनेक ठिकाणी पाणी साचले गेले होते. याठिकाणी असलेल्या अनेक इमारती आणि कार्यालयांमध्ये पाणी तुंबले गेले होते.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा