पाऊस धो धो कोसळत होता आणि चोर चोरी करत होता!


पाऊस धो धो कोसळत होता आणि चोर चोरी करत होता!
SHARES

मुंबईत 29 ऑगस्टला झालेल्या मुसळधार पावसामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली होती. यात अनेक जणांचा बळी गेला. तर कित्येकांनी आपले सर्वस्व गमावले. मात्र अनेक महाभागांनी पावसाची तमा न बाळगता चक्क या पुराचा फायदा घेत त्याच रात्री बंद दुकानाचे कुलूप तोडून चोरी केल्याचं समोर आलं आहे.


कशी केली चोरी?

मंगळवारी मुंबईत तुफान पाऊस पडला. पावसामुळे संपूर्ण मुंबईकर आपल्या घराच्या दिशेने पळत होते. हे पाहून घाटकोपरमधील असल्फा येथे असलेल्या ग्लोबल मेडिकलचे मालक मोहम्मद दानिश (30) यांनी देखील आपले दुकान दुपारी 4.30 वाजता बंद केले. ग्लोबल मेडिकल हे 24 तास सुरू राहणारे औषधांचे दुकान आहे. पण पूर परिस्थितीकडे बघून दानिश यांनी आपले दुकान बंद केले.

नेहमी दुकान बंद करताना मी 4 ते 5 हजार रुपये दुकानात ठेऊन उरलेले पैसे घरी नेतो. पण त्या दिवसाच्या परिस्थितीकडे बघून मी 50,000 रुपये गल्ल्यातच ठेवले आणि घरी गेलो. मात्र त्या दिवशी मी केवढी मोठी चूक केली, ते मला दुसऱ्या दिवशी समजले.

मोहम्मद दानिश, मालक, ग्लोबल मेडिकल

दुसऱ्या दिवशी सकाळी दानिश यांच्या मेहुण्याने त्यांना फोन करून दुकानात चोरी झाल्याचे सांगितले. दानिश यांनी दुकानात लावलेल्या सीसीटीव्हीचे फुटेज बघितले असता त्यात त्यांच्या दुकानात झालेली संपूर्ण चोरी रेकॉर्ड झाली होती.



सीसीटीव्हीत कैद झालेल्या दृश्याप्रमाणे, पहाटे पाच वाजून 10 मिनिटांनी एक चोर दुकानात शिरतो आणि त्यानंतर थेट दुकानातल्या गल्ल्यातून ठेवलेली सगळी रोकड घेऊन पळ काढतो. यावेळी चोराने एक-एक रुपयाची तब्बल 2000 रुपयांची चिल्लर देखील चोरल्याचे दानिश यांनी सांगितले.



हेही वाचा - 

एका मुंबईकराचं मुंबईकरांसाठी खुलं पत्र!


संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा