धारावीत चपलांच्या दुकानात चोरी

 Mumbai
धारावीत चपलांच्या दुकानात चोरी
धारावीत चपलांच्या दुकानात चोरी
धारावीत चपलांच्या दुकानात चोरी
See all

धारावी - संत रोहिदास मार्गावरील न्यू आशा फुट वेअर या दुकानाचे टाळे तोडून दोन अज्ञात चोरट्यांनी चोरी केल्याची घटना नुकतीच उघड झाली आहे. अज्ञात चोरट्यांनी 50 पेक्षा जास्त महागडे बूट आणि हजारो रुपयांची रोकड लांबविली. दरम्यान ही चोरी सीसीटीव्हीत कैद झाली असून, सीसीटीव्हीच्या माध्यमातून पोलीस चोरांचा शोध घेत आहेत. दुकानदार रिजवान शेख कुर्ल्यातील शेख जागृती नगरमध्ये राहतात. ते 15 जानेवारी 2017 रोजी 11. 30 वा. नेहमीप्रमाणे आपले धारावीतील दुकान बंद करून घराकडे निघून गेले होते. सकाळी दुकानाच्या शेजारी राहणाऱ्या इसमाने फोनवरून दुकानाचे टाळे तुटल्याचे त्यांना सांगितले. दुकान मालकाने तातडीने दुकान गाठले असता दुकानाचे टाळे तुटल्याचे त्याच्या निदर्शनास आले. विशेष म्हणजे हा अज्ञात चोरटा गेल्या चार दिवसांपासून दुकानात येऊन बुटांचे भाव काढीत होता. त्याने संपूर्ण दुकानाची टेहळणी केल्याचं दुकानदाराचं म्हणणं आहे.

Loading Comments