अंधेरीत नोकरानेच केली घरात चोरी

 Oshiwara
अंधेरीत नोकरानेच केली घरात चोरी
Oshiwara, Mumbai  -  

उच्चभ्रू लोकवस्ती असलेल्या अंधेरीतल्या लोखंडवाला परिसरात राहणाऱ्या व्यापाऱ्याच्या घरात नोकरांनीच चोरी केल्याचा प्रताप उघडकीस आलाय. या प्रकरणी व्यापारी मधुकर अग्रवाल यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. मधुकर यांचा प्लायवुडचा व्यवसाय आहे.

मधुकर यांनी काही दिवसांपूर्वी त्यांच्या लोखंडवाला फोर्थ क्रॉस लेन मनीष बंगला येथे चार जणांना नोकरीवर ठेवले होते. अग्रवाल हे 8 एप्रिलला दुपारच्या वेळी कामाच्या निमित्ताने मुंबईच्या बाहेर गेले होते. तेव्हा त्या चौघांनी याचाच फायदा घेत अग्रवाल यांची संपत्ती आणि सोनं चोरी करुन पोबारा केला.

मधुकर अग्रवाल जेव्हा संध्याकाळी पाच वाजता घरी परतले तेव्हा त्यांच्या घराचा दरवाजा बंद अवस्थेत होता. त्यावेळी त्यांना काहीतरी गैरप्रकार घडल्याचा संशय आला. त्यामुळे त्यांनी शेजारच्यांना बोलावून दरवाजा तोडला. घरात गेल्यानंतर जेव्हा सर्व सामानाची तपासणी केली तेव्हा चोरीचा प्रकार त्यांना लक्षात आला. यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी या प्रकरणी चारही आरोपींविरोधात गुन्हा दाखल करत त्यांचा शोध सुरू केला आहे.

Loading Comments