कोरोनावर मात करून ८५ दिवसांनी रुग्ण परतला घरी

५४ वर्षांचे भारत पांचाल ८५ दिवसानंतर कोरोनावर मात करून घरी परतले आहेत. हे गेल्या ८५ दिवसांपासून म्हणजे जवळपास तीन महिन्यांपासून भारत कोरोनाशी दोन हात करत आहेत. कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर जवळपास दोन आठवड्यांनी म्हणजे ८ एप्रिलला त्यांना ताप यायला सुरुवात झाली.

चारच दिवसांमध्ये त्यांच्या फुफ्फुसाला गंभीर संसर्ग झाला आणि एका आठवड्यातच त्यांना व्हेटिंलेटरवर ठेवावं लागलं. कोरोनाचं गांभीर्य ठरवणारा त्यांचा CT स्कोअर हा २१ वरून २५ वर पोहोचला होता.

त्यानंतर लवकरच पांचाल यांचे अवयव निकामी होण्याची भीती वाटून लागली. त्यांच्या किडनीला हानी झाली. यकृत काम करेनासं झालं, फुफ्फुसांची गंभीर समस्या निर्माण झाली आणि त्यातच ब्लॅक फंगसचा संसर्गही झाला.

७० दिवसांपासून पांचाल हे व्हेंटिलेटरवर होते. ते उपचार घेत असलेल्या हिरानंदानी रुग्णालयाच्या डॉक्टरांनी सांगितलं की, एका कोरोना रुग्णाला जे काही होतं, जे होण्याची शक्यता असते, तो प्रत्येक संसर्ग पांचाल यांना झाला आहे. गेल्या दीड वर्षात कोणी रुग्ण एवढा काळ रुग्णालयात दाखल आहे असं झालेलं नव्हतं.

डॉक्टरांनी रेमडेसिविर पासून प्लाज्मा थेरपीपर्यंत प्रत्येक गोष्ट केली. प्रत्येक प्रकारचे उपचार केले. पण कशाचाच परिणाम होत नव्हता. शेवटी त्यांच्या फुफ्फुसातून रक्त यायला सुरुवात झाली. तेव्हा तर पांचाल यांच्या कुटुंबियांनी आशाच सोडून दिली होती. पण १५ दिवसांतच त्यांनी पुन्हा उभारी घेतली आणि या सगळ्या संकटांमधून बरे होऊन घरी परतले.


हेही वाचा

सरकारी लसीकरण केंद्रावर स्पुटनिक व्ही मोफत मिळण्याची शक्यता

भारतात ऑगस्टपर्यंत कोरोनाची तिसरी लाट येणार, एसबीआय रिसर्चच्या अहवालात उघड

पुढील बातमी
इतर बातम्या