Advertisement

सरकारी लसीकरण केंद्रावर स्पुटनिक व्ही मोफत मिळण्याची शक्यता

रशियाची स्पुटनिक व्ही लसदेखील आता सरकारी लसीकरण केंद्रांवर मोफत उपलब्ध केली जाणार आहे, असं एका अधिकाऱ्यानं सांगितलं आहे.

सरकारी लसीकरण केंद्रावर स्पुटनिक व्ही मोफत मिळण्याची शक्यता
SHARES

रशियाची स्पुटनिक (Sputnik V) व्ही ही लसदेखील आता सरकारी लसीकरण (Vaccination center) केंद्रांवर मोफत उपलब्ध केली जाणार आहे. सध्या कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन लसीच लसीकरण केंद्रांवर दिल्या जात आहेत. तसंच, स्पुटनिक व्ही ही लस केवळ खासगी लसीकरण केंद्रांवर सशुल्क दिली जात आहे. आता ही लसदेखील आता सरकारी लसीकरण केंद्रांवर उपलब्ध केली जाणार आहे. 

केंद्र सरकारच्या कोविड-19 वर्किंग ग्रुपचे प्रमुख डॉ. एन. के. अरोरा यांनी ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला ही माहिती दिली. सध्या स्पुटनिक व्ही ही लस आयात केली जात आहे. लवकरच या लसीचे उत्पादन भारतात केले जाणार आहे. या लसीच्या पुरवठ्यानुसार सरकारी लसीकरण केंद्रांवर ही लस (Vaccine) लवकरच मोफत उपलब्ध करून दिली जाणार असल्याचे डॉ. अरोरा यांनी सांगितलं.

स्पुटनिक व्ही या लशीच्या साठवणुकीसाठी उणे १८ अंश सेल्सिअस तापमानाची गरज असते. पोलिओ लसींची साठवणूक ज्यात केली जाते, त्या कोल्डचेन सुविधांमध्ये स्पुटनिक व्ही लसीची साठवणूक करता येऊ शकते. या नियोजनामुळे ही लस गावोगावी पोहोचू शकेल, असंही डॉ. अरोरा यांनी ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला सांगितलं.

भारतात सध्या दररोज सरासरी सुमारे ५० लाख जणांचे लसीकरण (Vaccination Drive) करण्यात येत आहे. कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन लसींचा सध्याच्या लसीकरण मोहिमेत मोठा वाटा आहे. या लसींचे उत्पादन वाढवण्याचं नियोजन आहे.

तसंच, आता स्पुटनिक व्ही ही लसदेखील सरकारी लसीकरण कार्यक्रमात उपलब्ध केली जाणार आहे. त्याशिवाय मॉडर्ना आणि झायडस कॅडिला या दोन कंपन्यांच्या लसींनाही लवकरच मंजुरी मिळण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे आगामी काही आठवड्यांत रोजच्या लसीकरणाची संख्या ८० लाख ते एक कोटीपर्यंत जाऊ शकते, असे डॉ. अरोरा यांनी सांगितलं.

‘इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च’नं (ICMR) अलीकडेच जाहीर केलेल्या अहवालानुसार, कोरोना संसर्गाची तिसरी लाट २०२२च्या फेब्रुवारी ते मार्च महिन्यात येऊ शकते. त्या पार्श्वभूमीवर, चालू वर्षाअखेरीपर्यंत १८ वर्षांवरील सर्वांचे म्हणजेच सुमारे ९३ कोटी लोकसंख्येचे लसीकरण पूर्ण करण्याचं उद्दिष्ट सरकारनं ठेवलं आहे.

जुलै महिन्याअखेरीपर्यंत ५० कोटी डोस पूर्ण करण्याचे उद्दिष्ट सरकारनं ठेवलं होतं. सध्या लसीकरणाच्या आकड्यानं ३४ कोटींचा टप्पा पार केला आहे.



हेही वाचा

१११ दिवसांनंतर सोमवारी देशात सर्वात कमी रुग्णसंख्या

भारतात ऑगस्टपर्यंत कोरोनाची तिसरी लाट येणार, एसबीआय रिसर्चच्या अहवालात उघड

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा