Advertisement

१११ दिवसांनंतर सोमवारी देशात सर्वात कमी रुग्णसंख्या

जवळपास तीन महिन्यांनंतर रुग्णसंख्येत मोठी घट झाल्याचं दिसून येत आहे. तर रुग्ण बरे होण्याचं प्रमाणही वाढलं आहे.

१११ दिवसांनंतर सोमवारी देशात सर्वात कमी रुग्णसंख्या
SHARES

देशात कोरोनाची दुसरी लाट आता ओसरली असल्याचं दिसून येत आहे. दैनंदिन रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणावर घटली आहे. जवळपास तीन महिन्यांनंतर रुग्णसंख्येत मोठी घट झाल्याचं दिसून येत आहे. तर रुग्ण बरे होण्याचं प्रमाणही वाढलं आहे.

देशात सोमवारी कोरोनाचे ३४ हजार ७०३ नवीन रुग्ण आढळले. मागील १११ दिवसांतील ही निचांकी रुग्णसंख्या आहे. त्यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.   सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्याही घटली आहे. देशात सध्या ४ लाख ६४ हजार ३५७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 

सोमवारी ५५३ रुग्णांचा मृत्यू झाला. देशातील कोरोनाबळींचा एकूण आकडा ४ लाख ३ हजार २८१  झाला आहे. तर एकूण कोरोना रुग्णसंख्या ३ कोटी ६ लाख १९ हजार ९३२ वर गेली आहे. सोमवारी ५१ हजार ८६४ रुग्ण बरे झाले. देशात आतापर्यंत २ कोटी ९७ लाख ५२ हजार २९४ जणांनी कोरोनावर मात केली आहे.



हेही वाचा -

भारतात ऑगस्टपर्यंत कोरोनाची तिसरी लाट येणार, एसबीआय रिसर्चच्या अहवालात उघड

  1. गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वेमार्गावर धावणार विशेष गाड्या
Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा