वरळीच्या 'NSCI'मध्ये १० खाटांचा अतिदक्षता विभाग तयार

मुंबईतील कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या लक्षात घेता अनेक ठिकाणी कोरोना केंद्र सुरू करण्यात आली आहेत. यामध्ये कोरोनाच्या रुग्णांची चाचणी व त्यांच्यावर उपचार केले जात आहेत. याचप्रमाणं वरळीच्या ‘नॅशनल स्पोर्ट क्लब ऑफ इंडिया’ (एनएससीआय) संकुलातील करोना आरोग्य केंद्र आता करोना रुग्णालयात रुपांतरित होणार आहे. कोरोनाबाधित कर्करुग्ण, तुरूंगातील कैदी आणि पोलीस यांसह १ हजारांहून अधिक रुग्णांवर उपचार केले गेले असून, या ठिकाणी १० खाटांचा अतिदक्षता विभाग आठवडाभरात सुरू होणार आहे. त्यामुळं आता गंभीर प्रकृतीच्या रुग्णांना अन्य रुग्णालयांमध्ये न हलविता इथंच उपचार देण्यात येणार आहेत.

एनएससीआय संकुलात मार्च महिन्यात ६०० खाटांचं कोरोना केंद्र सुरू करण्यात आलं. यामधील ४० खाटांचा अतिदक्षता विभाग सुरू होत आहे. यातील दहा खाटांचे कामकाज पूर्ण झाले आहे. अतिदक्षता विभागात कॅमेरा बसविले आहेत. याच्या माध्यमातून रुग्णांसह यंत्रावरील नोंदीही ठेवता येणार आहेत. ४ रुग्णांमागे १ परिचारिका, १ वॉर्डबॉय आणि ५ रुग्णांमागे २ कनिष्ठ डॉक्टर असतील आणि एका वेळेस १ तज्ज्ञ डॉक्टर असणार आहे.

तज्ज्ञ डॉक्टर मुख्य मोठ्या पडद्यावरून रुग्णांना उपचार करण्यात कनिष्ठ डॉक्टरांना मार्गदर्शन करणार आहेत. जेणेकरून प्रत्यक्ष रुग्णांशी संबंध कमी आल्यानं संसर्ग होण्याची शक्यताही कमी असेल. त्यामुळं कमी मनुष्यबळामध्येही काम करणं शक्य होणार आहे. अशारितीने साधारणपणे ३० जणांचे मनुष्यबळ दहा खाटा सुरू करण्यासाठी गरजेचे आहे.


हेही वाचा -

महापालिकेच्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी विशेष बेस्ट बससेवा बंद

Coronavirus Updates : यंदा पदवी परीक्षा होणार नाहीत?


पुढील बातमी
इतर बातम्या