Advertisement

महापालिकेच्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी विशेष बेस्ट बससेवा बंद


महापालिकेच्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी विशेष बेस्ट बससेवा बंद
SHARES

लॉकडाऊनमुळं मुंबईतील सार्वजनिक वाहतुक सुविधा बंद होती. मात्र, अत्यावश्क सेवेतील कर्मचाऱ्यांना वाहतुकीची सेवा देण्यासाठी बेस्ट उपक्रमानं दहिसर, विरार, पनवेल, कल्याण या ठिकाणाहून व रुग्णालय ते हॉटेल अशी बेस्ट बससेवा सुरू केली होती. परंतु, १५ जूनपासून रेल्वेसेवा सुरू करण्यात आल्यानं शुक्रवार १९ जूनपासून बससेवा बंद करण्यात येत असल्याचं बेस्ट उपक्रमानं ई-मेलद्वारे कळवल्याची माहिती भाभा रुग्णालयातर्फे एका पत्रकाद्वारे देण्यात आली आहे.

लोकल रेल्वेसेवा सुरू करण्यात आल्यानं मुंबई महापालिकेच्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी बेस्ट बससेवा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वांद्रे येथील के. बी. भाभा रुग्णालयाने यासंबंधी पत्रक प्रसिद्ध करून आपल्या कर्मचाऱ्यांना स्पष्ट केलं आहे. पालिकेतील सर्वच अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाही हाच नियम लागू असल्याचं समजतं. कोरोना संसर्गाच्या संकटात काम करण्यासाठी अधिक मनुष्यबळ आवश्यक असल्यानं महापालिकेनं आपल्या कर्मचाऱ्यांना १०० टक्के उपस्थिती बंधनकारक केली असून, कामावर हजर न झाल्यास ७२ तासात बडतर्फ करण्याचा कठोर निर्णयही महापालिकेनं घेतला आहे. त्यामुळं कर्मचाऱ्यांची कार्यालयातील संख्या वाढू लागली आहे.

अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी लोकलसेवा सुरू करण्यात यावी, अशी मागणी राज्य सरकारच्यावतीनं सातत्यानं केंद्र सरकारकडं करण्यात येत होती. अत्यावश्यक सेवांमधील अनेक कर्मचारी दूरवर राहतात. या कर्मचाऱ्यांना दररोज मुंबईत ये-जा करण्यासाठी लोकलसेवा गरजेची आहे. विरार, कल्याण, कर्जत, कसारा या भागातील लोकांसाठी बससेवा सोयीची नाही, असं नमूद करण्यात आलं होतं.



हेही वाचा -

नाराजी नव्हतीच, फक्त समानता हवी, मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर काँग्रेसचं घुमजाव

पॉझिटिव्ह रिपोर्ट रुग्णांना सांगू नका, पालिकेच्या नियमावर मनसे नाराज



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा