Advertisement

नाराजी नव्हतीच, फक्त समानता हवी, मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर काँग्रेसचं घुमजाव

काँग्रेसला कोणत्याही बैठकीत डावललं गेलं नाही. त्यामुळे काँग्रेसमध्ये कुठल्याही प्रकारची नाराजी असण्याचा प्रश्नच नव्हता, असं बाळासाहेब थोरात म्हणाले.

नाराजी नव्हतीच, फक्त समानता हवी, मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर काँग्रेसचं घुमजाव
SHARES

राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीतील महत्त्वाचा पक्ष असून देखील सरकारच्या निर्णयप्रक्रियेत काँग्रेस मंत्र्यांना विश्वासात घेतलं जात नसल्याच्या मुद्द्यावरून नाराज असलेले काँग्रेस नेते प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मातोश्री (congress leader balasaheb thorat and ashok chavan meet maharashtra cm uddhav thackeray) निवासस्थानी भेट घेतली. यावेळी शिवसेना नेते खासदार संजय राऊत आणि अनिल परब देखील उपस्थित होते. 

समानता असावी

जवळपास तासभर झालेल्या चर्चेनंतर प्रसार माध्यमांशी बोलताना सरकारच्या प्रत्येक बैठकीत व निर्णय प्रक्रियेत काँग्रेसचा सहभाग होता. काँग्रेसला कोणत्याही बैठकीत डावललं गेलं नाही. त्यामुळे काँग्रेसमध्ये कुठल्याही प्रकारची नाराजी असण्याचा प्रश्नच नव्हता. केवळ सरकारमध्ये समानता असावी इतकीच आमची अपेक्षा होती. काही बाबींवर आमचं म्हणणं प्रत्यक्षात मुख्यमंत्र्यांपुढं मांडण्याची गरज होती, त्याला मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला, असं बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं. प्रशासकीय अधिकाऱ्याची निवड, विधान परिषदेच्या जागांबाबतही कुठले मतभेद नाहीत, हे देखील थोरात यांनी स्पष्ट केलं.

हेही वाचा - खाट का कुरकुरतेय? शिवसेनेचा काँग्रेसला चिमटा

जनतेचं सरकार

राज्यातील महाविकास आघाडीचं सरकार हे जनतेच्या भल्यासाही बनलेलं सरकार आहे. आतापर्यंत या सरकारने जे काही निर्णय घेतले आहेत, ते सर्व जनतेच्या हिताला प्राधान्य देऊनच घेतले आहेत. यापुढेही सरकारचं प्राधान्य सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यालाच राहील. या कामी काँग्रेसची सरकारला नेहमीच साथ राहील, असं बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केलं.  

मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत प्रामुख्याने लाॅकडाऊन आणि चक्रीवादळामुळे संकटात सापडलेल्या जनतेला दिलासा देण्यासाठी काय करता येईल, याबाबत काँग्रेसने आपलं म्हणणं मुख्यमंत्र्यांपुढे मांडलं. लाॅकडाऊनमुळे मागील अडीच महिन्यांपासून सर्वसामान्य माणूस घरात अडकून पडला आहे. त्याच्या उत्पन्नावर मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे त्याला रोख रकमेच्या स्वरूपात आर्थिक मदत मिळायला हवी, असं आम्हाला वाटतं.

शिवाय चक्रीवादळामुळे कोकणातील बागा उद्ध्वस्त झाल्या आहेत. त्यांना हेक्टरी गणित न लावता गुंठ्यांनुसार मदत करायला हवी, अशी अपेक्षाही मुख्यमंत्र्यांकडे व्यक्त केल्याचं थोरात यांनी सांगितलं.

 शिवसेनेचे मुखपत्र सामनातून काँग्रेसला लक्ष्य करण्यात आलं होतं. त्याबाबत विचारचं असता यावर बोलून झालंय. आता पुन्हा तो विषय नको, असं थोरात म्हणाले.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा