देशात कोरोना रुग्ण बरे होण्याच्या यादीत ठाणे शहर दुसऱ्या स्थानावर तर राज्यात पहिल्या स्थानावर आले आहे. ठाणे शहरात कोरोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ८९ टक्यांवर पोहोचले आहे. महाराष्ट्राचे रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ७१ टक्के आहे.
ठाणे महापालिका क्षेत्रात जून महिन्याच्या शेवटच्या आठवडय़ात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला. त्यानंतर शहरात दररोज चारशे ते पाचशे रुग्ण आढळून येत होते. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेने विविध उपाययोजना करण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे ठाणे शहरात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. शहरातील रुग्ण संख्या दररोज दोनशेवर आली आहे.
आतापर्यंत ठाण्यात २३ हजार १ रुग्ण आढळून आले. त्यापैकी २१ हजार १३९ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ८९ टक्के इतकं जास्त असल्याचे दिसून येत आहे. शहरातील मृत्यू दर देखील कमी होऊन तो ३.२ टक्के झाला आहे. तर प्रत्यक्ष उपचार घेणाऱ्यांची संख्या १९४० आहे. येथील रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधीही १०२ दिवसांवर गेला आहे.
रुग्ण बरे होण्याचं प्रमाण
ठाणे ८९ टक्के
मुंबई ८१ टक्के
पुणे ७८ टक्के
नवी मुंबई ८२ टक्के
कल्याण-डोंबिवली ८५ टक्के
हेही वाचा -
मुंबईतील अनेक रुग्णालयं होणार नॉनकोविड
मोडक सागर पाठोपाठ 'ही' तलावं ओव्हरफ्लो होण्याची शक्यता