Advertisement

मुंबईतील अनेक रुग्णालयं होणार नॉनकोविड

पावसाळी आजारांचं आव्हान लक्षात घेता, रुग्णालये नॉनकोविड करण्यात येणार आहेत.

मुंबईतील अनेक रुग्णालयं होणार नॉनकोविड
SHARES

मागील ५ महिन्यांपासून कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळं हैराण झालेल्या नागरिकांना आता साथीच्या आजारांचा सामना करावा लागतो आहे. दरवर्षी पावसाळ्यात साथीचे आजार डोक वर काढतात. मात्र, यंदा कोरोनासोबत साथीच्या आजार वाढत असल्यानं नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी महापालिकेनं खासगी रुग्णालयांसह उपनगरांमधील छोटी नर्सिग होम, रुग्णालयांमध्येही कोरोनाचे रुग्ण दाखल करण्यासंदर्भात निर्देश दिले होते. मात्र, आता पावसाळी आजारांचं आव्हान लक्षात घेता, आता ही रुग्णालये नॉनकोविड करण्यात येणार आहेत.

अखेरचा कोरोना रुग्णाला घरी पाठवल्यानंतर ७० रुग्णालये कोरोनाव्यतिरिक्त आजारांच्या उपचारासाठी खुली करण्यात येणार आहेत. पावसाळ्यात मलेरिया, डेंग्यू, लेप्टोस्पायरोसिस तसंच, इतर संसर्गजन्य तापांचा जोर वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी जुलै व ऑगस्टमध्ये मलेरिया रुग्णांची संख्या जास्त दिसून आली. तसंच २ रुग्णांचा मलेरियामुळे मृत्यूही झाला.

महापालिकेनं सुरू केलेल्या नियंत्रण कक्षामार्फत शहराच्या प्रत्येक प्रभागात छोट्या रुग्णालयांसह नर्सिग होममध्येही कोरोनाचे रुग्ण दाखल करण्यात आले आहेत. परंतु, कोरोनाच्या रुग्णांची संख्या आता नियंत्रणात येत असल्यानं संसर्ग झालेल्या नव्या रुग्णांना मोठ्या रुग्णालयांसह जम्बो सुविधा, कोरोना काळजी कक्षाची उपलब्धता असणार आहे.

महापालिकेच्या केईएमसह काही उपनगरीय रुग्णालयांमध्ये संध्याकाळच्या ओपीडीची उपलब्धता असते. या ओपीडींमधून रुग्णांना आता वैद्यकीय सेवा देण्यात येणार आहे. कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात आल्यानंतर महापालिकेने मागील महिन्यात नायर रुग्णालयाचे रूपांतर पुन्हा नॉनकोविड रुग्णालयामध्ये केलं असून, टप्प्याटप्प्याने काही विभाग पुन्हा सुरू करण्यात आले.



हेही वाचा -

मुंबईत ऑगस्टमध्ये मलेरियाचे ५९२ रुग्ण

मुंबईत कोरोनाचे ११३२ नवे रुग्ण, दिवसभरात ४६ जणांचा मृत्यू



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा