Advertisement

मुंबईत कोरोनाचे ११३२ नवे रुग्ण, दिवसभरात ४६ जणांचा मृत्यू

बुधवारी दिवसभरात ८६४ जणांनी कोरोनावर मात केली असून कोरोनाची लागण झालेल्या एकूण १ लाख ६०५७ रुग्णांनी कोरोनावर मात करण्यात यश मिळवले आहे.

मुंबईत कोरोनाचे ११३२ नवे रुग्ण, दिवसभरात ४६ जणांचा मृत्यू
SHARES

मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. राज्यात बुधवारी कोरोने ३४६ जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे प्रशासनाच्या डोकेदुखीत वाढ झाली आहे. असे असताना मुंबईत मात्र काही प्रमाणात कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात पालिकेला यश आल्याचे पहायला मिळते. मुंबईत बुधवारी दिवसभरात ११३२ नवीन रुग्ण आढळले आहेत. मुंबईत बुधवारी दिवसभरात ४६ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात कोरोनाबाधीत रुग्णांमध्ये मुंबई दुसऱ्या क्रमांकावर आहे.

हेही वाचाः-अरे बापरे ! राज्यात ४२२ जणांचा एका दिवसात कोरोनाने मृत्यू, ११ हजार ११९ नवे रुग्ण

राज्यात कोरोनाच्या वाढत्या मृत्यूवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. सध्या कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७१ टक्क्यांवर मृतांच्या एकूण संख्येत बुधवारी भर पडली आहे. मुंबईत गेल्या २४ तासांत कोरोनाचे ४६ रुग्ण दगावले आहेत. तर १६ आॅगस्ट रोजी ४० मृत व्यक्तींची नोंद झाली आहे. त्या पूर्वी १७ आॅगस्ट रोजी एकूण ४९ जण या आजाराला बळी पडल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले आहे. या शिवाय बुधवारी मुंबईत कोरोनाचे ११३२ नवीन रुग्ण आढळले आहेत. मुंबईत रुग्णांची एकूण संख्या आता १ लाख ३१ हजार ५४२ इतकी झाली आहे. तर बुधवारी दिवसभरात ८६४ जणांनी कोरोनावर मात केली असून कोरोनाची लागण झालेल्या एकूण १ लाख ६०५७ रुग्णांनी कोरोनावर मात करण्यात यश मिळवले आहे. त्यामुळं मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे.

हेही वाचाः-सरकारला परीक्षा रद्द करण्याचा अधिकार नाहीच, यूजीसीची न्यायालयात भूमिका

राज्यात आज ९०११ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७१.०९ टक्के एवढे आहे. राज्यभरात आतापर्यंत एकूण ४ लाख ४६ हजार ८८१ रुग्ण बरे झाले आहेत. आज १३ हजार १६५ नविन रुग्णांचे निदान झाले असून सध्या १ लाख ६०  हजार ४१३ रुग्णांवर (ॲक्टीव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी  दिली. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ३३ लाख ३७ हजार ८४८ नमुन्यांपैकी ६ लाख २८ हजार ६४२ नमुने पॉझिटिव्ह (१८.८३ टक्के) आले आहेत. राज्यात ११ लाख ६२ हजार ४५० लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ३७ हजार ०९४ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज ३४६ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ३.३५ टक्के एवढा आहे

आज निदान झालेले १३,१६५ नविन रुग्ण आणि नोंद झालेले ३४६ मृत्यू यांचा तपशील असा(कंसात आज नोंद झालेले मृत्यू) : मुंबई मनपा-११३२ (४६), ठाणे- २३७ (५), ठाणे मनपा-२४१ (९), नवी मुंबई मनपा-३५२ (८), कल्याण डोंबिवली मनपा-३८६ (१२), उल्हासनगर मनपा-२० (३), भिवंडी निजामपूर मनपा-२६ (२), मीरा भाईंदर मनपा-१४० (३), पालघर-२३७(८), वसई-विरार मनपा-१८२ (६), रायगड-२७० (४), पनवेल मनपा-२२७ (३), नाशिक-२३१ (२), नाशिक मनपा-५२० (३), मालेगाव मनपा-२५ (१), अहमदनगर-२९६ (७),अहमदनगर मनपा-३०७ (६), धुळे-३० (२), धुळे मनपा-५८ (१), जळगाव-४९६ (८), जळगाव मनपा-१०९ (१), नंदूरबार-३८, पुणे- ६६० (२१), पुणे मनपा-१२३३ (३८), पिंपरी चिंचवड मनपा-७९५ (२७), सोलापूर-३९९ (१५), सोलापूर मनपा-६७ ,सातारा-२८६ (९), कोल्हापूर-३८७ (१३), कोल्हापूर मनपा-१४७ (२), सांगली-९६ (६), सांगली मिरज कुपवाड मनपा-२२३ (१२), सिंधुदूर्ग-१४ (२), रत्नागिरी-४३ , औरंगाबाद-१७८ (१),औरंगाबाद मनपा-३६८, जालना-१५०, हिंगोली-३५(१), परभणी-४८, परभणी मनपा-५६ (३), लातूर-५० (१), लातूर मनपा-८१(२), उस्मानाबाद-३०६ (६), बीड-२६३ (२), नांदेड-१०३ , नांदेड मनपा-८३, अकोला-४५ (१), अकोला मनपा-१५ (१), अमरावती-३०, अमरावती मनपा-८१, यवतमाळ-५८ (१०), बुलढाणा-७२, वाशिम-१३ , नागपूर-१८० (३), नागपूर मनपा-८१७ (२३), वर्धा-५९ (१), भंडारा-४३ (४), गोंदिया-३४ (१), चंद्रपूर-६१, चंद्रपूर मनपा-४, गडचिरोली-१३, इतर राज्य ९ (१).

Read this story in English
संबंधित विषय