कोरोनाव्हायरस हवेतून पसरू शकतो, शास्त्रज्ञांचा दावा

जगभरता कोरोना व्हायरसनं थैमान घातलं आहे. भारतात देखील कोरोनाचा पार्दुर्भाव वाढत आहे. पण कोरोना संदर्भात एक महत्त्वपूर्ण खुलासा शास्त्रज्ञांनी केला आहे. शास्त्रज्ञांनी केलेल्या दाव्यामुळे चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. 

कोरोनाबाबत 32 देशांतील 239 वैज्ञानिकांनी दावा केला आहे की, कोरोना व्हायरस हवेतूनही पसरू शकतो. यासंदर्भात शास्त्रज्ञांनी WHO ला खुले पत्र देखीलं लिहलं आहे. यापूर्वी WHO नं कोरोना हवेतून पसरत नाही, असा दावा केला होता. पण शास्त्रज्ञांनी WHO च्या दाव्यावर काही प्रश्न उपस्थित केले आहेत. शिवाय WHO याबद्दल गंभीर नाही असा आरोप देखील केला आहे.    

न्यूयॉर्क टाईम्सनं दिलेल्या वृत्तानुसार, २३९ शास्त्रज्ञांनी असा दावा केला आहे, हवेतील छोट्या कणांमुळे कोरोना विषाणूची लागण होऊ शकते. शास्त्रज्ञांनी सांगितलं की त्यांना याचा पुरावा मिळाला आहे आणि त्यांनी WHO ला या आजारा संबंधित मार्गदर्शक तत्त्वांमध्ये बदल करण्यास सांगितलं आहे.


दिलासादायक! १०४ वर्षांच्या आजोबांची कोरोनावर मात


शास्त्रज्ञांनी सांगितलं की, त्यांनी या विषयावर गांभीर्य दाखवावं आणि पुढील आठवड्यात हा पेपर एका विज्ञान जर्नलमध्ये प्रकाशित करावा. WHOच्या म्हणण्यानुसार कोरोनोचा आजार प्रामुख्यानं एका व्यक्तीकडून दुसर्‍या व्यक्तीकडे लहान ड्रॉपलेटद्वारे पसरतो, जो शिंका येणे किंवा बोलताना तोंडातून बाहेर पडतो.

शास्त्रज्ञांचा दावा आहे की, शिंका आल्यानंतर हवेत दूरपर्यंत मोठे ड्रॉपलेट किंवा लहान ड्रॉपलेट लोकांना संक्रमित करण्यास सक्षम असतात. ते बराच काळ बंद हवेत राहतात आणि आजूबाजूच्या सर्व लोकांना संक्रमित करतात. मात्र WHOनं न्यूयॉर्क टाइम्सला दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की संशोधकांनी दिलेला पुरावा पुरेसा नाही.

न्यूयॉर्क टाईम्सला WHO चे डॉ. बेनेडेटा अलेंगरन्झी म्हणाले, 'विशेषत: गेल्या दोन महिन्यांत आम्ही बर्‍याचदा असं म्हटलं आहे की, हा रोग हवेच्या माध्यमातून पसरतो यावर आम्ही संशोधन करत आहोत. पण हे सिद्ध करण्यासाठी कोणतेही ठोस पुरावे नाहीत'.


हेही वाचा

Mira Bhayandar: कमी चाचण्यांमुळेच मिरा-भाईंदरमध्ये वाढताहेत रूग्ण- देवेंद्र फडणवीस

Vasai Virar Nalasopara Containment Zones List : 'हे' आहेत वसई, विरार, नालासोपारातील कंटेन्मेंट झोन

पुढील बातमी
इतर बातम्या