Advertisement

दिलासादायक! १०४ वर्षांच्या आजोबांची कोरोनावर मात

दिलासादायक हातमी म्हणजे एका १०४ वर्षांच्या आजोबांनी कोरोनावर मात केली आहे.

दिलासादायक! १०४ वर्षांच्या आजोबांची कोरोनावर मात
SHARES

कोरोनाबाधित (Coronavirus) रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. दिलासादायक बाब म्हणजे कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याचं प्रमाण देखील वाढलं आहे. कल्याण डोंबिवलीतून देखील एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. एका १०४ वर्षांच्या आजोबांनी कोरोनावर मात केली आहे.

कल्याण पूर्वेतील दुर्गा माता रोड परिसरात राहणाऱ्या मुकेश झा या इसमाला २१ जूनला कोरोनाची लागण झाल्याचं निदान झालं होतं. त्यांनंतर त्यांच्या तीन मुलांसह त्यांच्या १०४ वर्षे वय असलेल्या वडिलांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह असल्याचं स्पष्ट झालं. २३ तारखेला त्यांचे वडील आनंदी झा याना ठाणे इथल्या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं.


ठाण्यात मुंबईपेक्षा कोरोनाचे अ‍ॅक्टिव्ह रुग्ण अधिक


तब्बल ११ दिवसाच्या लढ्यानंतर प्रचंड इच्छा शक्तीच्या जोरावर १०४ वर्षाचे आनंदी झा यांनी कोरोनाला हरवलं. त्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानं त्यांना रविवारी सायंकाळी डिस्चार्ज देण्यात आला. त्यानंतर ते कल्याण इथल्या घरी परतले. कोरोनाला हरवणाऱ्या या वयोरुद्ध योद्ध्याचं परिसरातील नागरिकांनीही आनंदात स्वागत केलं.

दरम्यान, सध्या कल्याण डोंबिवलीत लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. जेणेकरून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यास मदत होईल. परंतु, लॉकडाऊन असला तरी कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. कल्याण डोंबिवलीत रविवारी कोरोनाचे नवे ४८२ रुग्ण आढळले आहेत. पण दिलासादायक म्हणजे आतापर्यंत ३ हजार ५८२ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

मुंबईत रविवारी दिवसभरात १ हजार ३११ नवीन रुग्ण आढळल्याने कोरोनाशी दोन हात करणाऱ्या अत्यावश्यक सेवांवरील भार दिवसेंदिवस वाढतच आहे. मुंबईत रविवारी दिवसभरात ६९ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात कोरोनाबाधीत रुग्णांमध्ये मुंबई दुसऱ्या क्रमांकावर आहे. 

राज्यात रविवारी कोरोनाच्या ६ हजार ५५५ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात ८६ हजार ४० रुग्णांवर (Active) उपचार सुरू आहेत. आज ३६५८ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून एकूण संख्या १ लाख ११ हजार ७४० झाली आहे. राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५४.८ टक्के एवढे आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.


हेही वाचा

सौम्य लक्षणं असलेल्या रुग्णांवर आता घरीच उपचार, केंद्राची नवी नियमावली

कोरोनाचा कहर ! राज्यातील कोरोनाबाधितांनी ओलांडला २ लाखांचा टप्पा

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा