Advertisement

सौम्य लक्षणं असलेल्या रुग्णांवर आता घरीच उपचार, केंद्राची नवी नियमावली

सौम्य लक्षण आणि लक्षणं नसलेल्या कोरोना रुग्णांवर आता घरीच विलगीकरण करून उपचार होणार आहेत.

सौम्य लक्षणं असलेल्या रुग्णांवर आता घरीच उपचार, केंद्राची नवी नियमावली
SHARES

सौम्य लक्षण आणि लक्षणं नसलेल्या कोरोना रुग्णांवर आता घरीच विलगीकरण करून उपचार होणार आहेत. रुग्णालयांवरील ताण कमी करण्याकरता केंद्र सरकारने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. घरीच उपचार होणार असले तरी डॉक्टरांची पूर्ण नजर या रुग्णांवर असणार आहे. यासाठी केंद्र सरकारने नियमावली जाहीर केली आहे.

देशात दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढतच चालल्याने रुग्णालयांवरील ताणही वाढत आहे. त्यामुळे अतिसौम्य आणि लक्षणं नसलेल्या रुग्णांवर घरीच उपचार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर हमीपत्रावर स्वाक्षरी करुन रुग्ण घरी राहूनच आपला उपचार सुरू करू शकतो. मात्र, घरात विलगीकरण आणि कुटुंबातील अन्य सदस्यांना वेगळे राहण्याची सुविधा असली पाहिजे. एचआयव्ही, रोपणाची शस्त्रक्रिया झालेले, कर्करोगावर उपचार घेत असलेल्या रुग्णांना ही सुविधा दिली जाणार नाही. तसंच उच्चरक्तदाब, मधुमेह, ह्रदयविकार, फुफ्फुस, यकृत, मूत्रपिंडाचे आजार असलेल्या रुग्णांना योग्य वैद्यकीय मूल्यमापनानंतरच घरी विलगीकरणाची परवानगी मिळेल.

हे आहेत नियम

  • घरी विलगीकरणात तिहेरी पदरांचा मास्क घालणं अनिवार्य आहे. हा मास्क दर आठ तासांनंतर किंवा खराब झाल्यानंतर बदलायचा आहे. बदलण्यापूर्वी या मास्कचे १ टक्का सोडियम हायड्रोक्लोराइडने निर्जंतुकीकरण केले नाही, तर याच मास्कच्या माध्यमातून करोना विषाणूचा फैलाव होऊ शकतो.
  • हातांना साबणाच्या पाण्याने कमीत कमी ४० सेकंदांपर्यंत धुवायचे आहे.
  • कोरोनाडी लक्षणे असलेला रुग्ण आपल्याच खोलीत राहणें आवश्यक आहे.
  • रुग्णासोबत एक सुश्रुषा करणारी व्यक्ती २४ तास उपलब्ध असायला हवी. ही व्यक्ती जिल्हा निगराणी अधिकाऱ्याला २४ तास माहिती देत राहील. सुश्रुषा करणारी व्यक्ती आणि रुग्णाच्या संपर्कात येण्याची शक्यता असलेल्या सर्वांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार हायड्रॉक्सिक्लोरोक्वीन प्रोफिलॅक्सिस घेणे आवश्यक आहे.
  • रुग्णापाशी जाताना २ मीटरचे अंतर, फेकता येतील असे हातमोजे, तीनपदर मास्क घालणे आणि त्यांना फेकल्यावर ४० सेकंद हात धुण्यासारखी सर्व काळजी घ्यावयाची आहे.
  • साफसफाई करताना रुग्णाच्या तोंडातून किंवा नाकातून बाहेर पडलेल्या डिस्चार्जच्या थेट संपर्कात येण्याचे टाळायचे आहे. रुग्णाच्या वस्तूंना हात लावू नये आणि त्यांची भांडी आणि कपडे स्वतंत्रपणे धुवावी.
  • रुग्णाने आपल्या मोबाईलमध्ये आरोग्य सेतू अॅप डाऊनलोड करावा.
  • सरकारच्या विद्यमान डिस्चार्ज धोरणानुसार कोरोना रुग्ण सलग तीन दिवस ताप नसलेल्या स्थितीत लक्षणांच्या १० दिवसांनंतर घरचे विलगीकरण बंद करु शकतो.
  • या काळात श्वास घेण्यास त्रास होणे, छातीत दुखणे, ओठ निळे पडणे, मानसिक भ्रम किंवा उभे राहण्यास त्रास होत असल्यास तात्काळ उपचार करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्याला सांगितले पाहिजे.
  • घरच्या विलगीकरणाचा कालावधी संपल्यानंतर चाचणीची आवश्यकता नसल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.



हेही वाचा -

मुसळधार पावसामुळे मुंबईतील 'हे' रस्ते बंद

पीपीई कीटमध्येच डॉक्टर तरुणी थिरकली ‘हाय गर्मी’वर, पहा हा भन्नाट डान्स




Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा