Advertisement

पीपीई कीटमध्येच डॉक्टर तरुणी थिरकली ‘हाय गर्मी’वर, पहा हा भन्नाट डान्स

रिचा नेगी या तरुण महिला डॉक्टरने पीपीई कीट घालून हाय गर्मी या गाण्यावर डान्स करतानाचा एक भन्नाट व्हिडिओ सोशल नेटवर्किंगवर डॉक्टर्स डेच्या दिवशीच पोस्ट केला आहे.

पीपीई कीटमध्येच डॉक्टर तरुणी थिरकली ‘हाय गर्मी’वर, पहा हा भन्नाट डान्स
SHARES

कोरोना रुग्णांवर गेली काही महिने आपला जीव धोक्यात घालून डॉक्टर उपचार करत आहे. रुग्णालयात काम करताना डॉक्टरांवरही प्रचंड मानसिक ताण आहे. अशातच मुंबईतील रिचा नेगी या तरुण महिला डॉक्टरने पीपीई कीट घालून हाय गर्मी या गाण्यावर डान्स करतानाचा एक भन्नाट व्हिडिओ सोशल नेटवर्किंगवर डॉक्टर्स डेच्या दिवशीच पोस्ट केला आहे.


आम्ही स्वत: या गर्मी होणार्‍या मात्र तितक्याच सुंदर दिसणार्‍या पोशाखामध्ये असलो तरी सध्याच्या परिस्थितीमध्ये नकारात्मकतेला आम्ही दूर ठेवण्याचा प्रयत्न करतोय. आम्ही आमचा जीव धोक्यात घालून सकारात्मक राहू शकतो. तर तुम्हीही या वाढवलेल्या लॉकडाउनच्या कालावधीमध्ये थोडं सकारात्मक राहणं गरजेचं आहे, असं रिचा या पोस्टमध्ये म्हणते. डॉक्टर्स डे आणि १ जुलैपासून महाराष्ट्रामध्ये महिनाभरासाठी वाढलेल्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर रिचाने सर्वसामान्यांना या गोष्टींकडे सकारात्मक नजरेतून पाहा असं आवाहन केलं आहे.
हेही वाचा -

Mumbai Containment Zones : 'ही' आहे मुंबईतील कंटेन्मेंट झोनची यादी

Mumbai Containment Zones : 'ही' आहे मुंबईतील कंटेन्मेंट झोनची यादी
Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा