Keep an identity card in your pocket घराबाहेर पडताना खिशात ओळखपत्र ठेवा, अन्यथा पोलिस कारवाईला सामोरे जा

घराबाहेर पडणार असाल तर ओळखपत्र व आवश्यक कागदपत्रे जवळ बाळगा. असे आवाहन पोलिसांनी नागरिकांना केले आहे.

Keep an identity card in your pocket घराबाहेर पडताना खिशात ओळखपत्र ठेवा, अन्यथा पोलिस कारवाईला सामोरे जा
SHARES

महाराष्ट्रात सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी ऐकीकडे प्रशासन शर्तीचे प्रयत्न करत असताना. दुसरीकडे नियमांचे उल्लंघन करत नागरिक बिनदिक्कत रस्त्यावर फिरत असल्याने पोलिसांनी धडक कारवाई सुरू केली. विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांवर पोलिसांनी थेट गुन्हे नोंदवण्यास सुरूवात केली. तर गाड्या घेऊन फिरणाऱ्यांच्या गाड्याचं जप्त केल्या, अत्यावश्यक सेवा वगळता कुणीही घराबाहेर पडू नये, तसेत घराबाहेर पडणार असाल तर ओळखपत्र व आवश्यक कागदपत्रे जवळ बाळगा. असे आवाहन पोलिसांनी नागरिकांना केले आहे.

हेही वाचाः- मुंबईत पावसाची संततधार; मागील २४ तासांत 'इतकी' नोंद

दोन किलोमीटरच्या परिसरातच प्रवास करण्याची अट सरकारकडून नुकतीच माघार घेण्यात आली आहे. मात्र घरातून बाहेर सार्वजनिक ठिकाणी किंवा कामासाठी प्रवास करताना आता ओळखपत्र सोबत ठेवावं लागणार आहे, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. मुंबई शहरातील कोरोनाचा विळखा दिवसागणिक वाढत आहे. कोरोना बाधितांचा आकडाही भयावह पद्धतीने वाढला आहे. अशा परिस्थितीत सोशल डिस्टंसिंगचं पालन करण्याचं महत्व जास्तच वाढणार आहे. अत्यावश्यक सेवा व मेडिकल इमर्जन्सी  वगळता बाकी कुणालाही कामा व्यतिरिक्त बाहेर न फिरण्याचे आदेश सर्वत्र असताना. अनेक नागरिक बिनदिक्कत बाहेर फिरत असल्याने पोलिसांनी अशा बेशिस्त नागरिकांवर कारवाईचा धडका सुरू केला. विनाकारण बाहेर फिरणारे आणि लॉकडाऊनचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी १ लाखाहून अधिक गुन्हे दाखल केले आहेत. तर  विनाकारण गाड्या घेऊन फिरणाऱ्यांच्या राज्यातभरात ८८ हजार ३०६ वाहने पोलिसांनी जप्त केली आहेत.

हेही वाचाः- 'कोस्टल' प्रकल्पात आवश्यक खबरदारी, पाणी साचल्यास तक्रारीच आवाहन

सध्या अनलाॅक १ सध्या सुरू असताना लोकांचा सार्वजनिक ठिकाणचा वावर बराचसा वाढला आहे. त्यावर आवर घालण्यासाठी प्रशासनाने नवे नियम लागू केले आहेत. त्यातून २ किलोमीटर परिसरात फिरण्याची अट ही काढण्यात आली असली. तरी खिशात अत्यावश्यक सेवेचे ओळखपत्र ठेवणे गरजेचे असल्याचे नमूद करण्यात आले आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी दररोज नवीन नियम लागू केले जात असताना, आता प्रशासनाकडून या नव्या नियमाचीही अमंलबजावणी केली जाणार आहे.

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा