Advertisement

'कोस्टल' प्रकल्पात आवश्यक खबरदारी, पाणी साचल्यास तक्रारीच आवाहन


'कोस्टल' प्रकल्पात आवश्यक खबरदारी, पाणी साचल्यास तक्रारीच आवाहन
SHARES

मुंबईत वाढत्या वाहनांमुळं वाहतूक कोंडीत वाढ झाली आहे. त्यामुळं या वाहतूक कोंडीवर नियंत्रण मिळविण्यासाठी मुंबईत कोस्टल रोडचं काम सुरु करण्यात आलं आहे. मात्र, सध्या पावसानं चांगलाच जोर धरला असल्यामुळं पाणी साचण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळं पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कोस्टल रोड प्रकल्पात आवश्यक ती सर्व खबरदारी घेतली जात आहे. 

या प्रकल्पातील कामांमुळे पाणी सचल्यास तात्काळ उपाययोजना करण्यासाठी प्रियदर्शिनी उद्यान, अमरसन्स उद्यान व वरळी डेअरी या ३ ठिकाणी नियंत्रण कक्ष उभारण्यात आल्याची माहिती महापालिकेच्या वतीनं देण्यात आली आहे.

दक्षिण मुंबईतील शामलदास गांधी मार्ग, गिरगाव ते राजीव गांधी सागरी सेतू, वरळी यांना जोडणाऱ्या ९.९८ किमीच्या कोस्टल रोडचे काम वेगाने सुरू आहे. बांधकाम सुरू असलेल्या भागात पाणी साचण्याची समस्या उद्भवल्यास नागरिकांनी संबंधित नियंत्रण कक्षाकडे किंवा पालिकेच्या मुख्य नियंत्रण कक्षाच्या १९१६ या दूरध्वनीवर तक्रार नोंदवावी, असे आवाहन करण्यात आलं आहे.

इथं नोंदवा तक्रार

अमरसन्स उद्यान नियंत्रण कक्ष

 • आपत्कालीन क्रमांक ०२२-२३६१०२२१
 • राकेश सिंग सिसोदीया, अधिकारी ९१६७०६११०६ प्रकल्प व्यवस्थापकीय सल्‍लागार प्रतिनिधी देवेंद्र प्रसाद ९९६७०१४३६२
 • निवासी अभियंता राजेश जाधव ९७०२४६७५७५

वरळी डेअरी नियंत्रण कक्ष

 • आपत्कालीन क्रमांक ०२२-२४९००३५९
 • अविक पांजा, अधिकारी ८६५७५००९००
 • आजाद सिंग, अधिकारी ९८१९०२६५९५
 • प्रकल्प व्यवस्थापक स्‍वर्णेंदु सामंता ७०१६७६५०७६
 • शशिकांत एस. व्‍ही. ९१३६९९३७०३

प्रियदर्शिनी उद्यान एमएसआरडी नियंत्रण कक्ष

 • आपत्कालीन क्रमांक ०२२-२३६२९४१०
 • संदीप सिंग, अधिकारी ९९५८८९९५०१
 • उत्पल दत्ता, अधिकारी ९९५८७९३०१२
 • प्रकल्प व्यवस्थापक किम जॅन्‍ग यॉन्ग ७०४५९०१३६६
 • निवासी अभियंता विजय जंगम ७०८५४९३६३८
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा