Advertisement

मुंबईत पावसाची संततधार; मागील २४ तासांत 'इतकी' नोंद


मुंबईत पावसाची संततधार; मागील २४ तासांत 'इतकी' नोंद
SHARES

मुंबईत विश्रांती घेतलेल्या पावसानं जोरदार कमॅबक केला आहे. मुंबईत मागील २४ तास पावसाची संततधार सुरूच आहे. हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार, मुंबईत मुसळधार पाऊस कोसळत आहे. मुंबईत सकाळ पासूनच ढगाळ वातावरण आहे.

मुंबई शहर आणि उपनगरात शुक्रवारपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. रविवारी सकाळी पावसाचा जोर अधिकच वाढला आहे. कुलाबा वेधशाळेच्या नोंदीनुसार मुंबई शहरात गेल्या २४ तासांत १३१ मिलीमीटर पाऊस पडला तर सांताक्रूझ वेधशाळेच्या नोंदीनुसार उपनगरांत २०१ मिलीमीटर पाऊस झाला आहे. ठाण्यामध्ये १४६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.

मागील २ दिवसांपासून पाऊस थांबायचं नाव घेत नाही. मुंबईसह ठाणे, पालघर, नवी मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातही मुसळधार पाऊस कोसळत आहे. या मुसळधार पावसामुळं मुंबईच्या सखल भागात पाणी साचलं आहे.

मुंबईच्या हिंदमाता, परळ, दादर, माटुंगा, किंग्ज सर्कल, सायन, मालाड, अंधेरी, बांद्रा, कुर्ला यांसह अनेक भागात पाणी साचलं आहे. महापालिकेचे कर्मचारी पाण्याचा निचरा करण्यासाठी मोठे प्रयत्न करत आहेत. तसंच, ममुंबईकरांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा