Advertisement

Coronavirus Cases : मुंबईत कोरोनाचे १३११ नवे रुग्ण, दिवसभरात १५१ जणांचा बळी

मुंबईत मागील २४ तासात करोनाचे २४२० रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आतापर्यंत कोरोनाची लागण झालेल्या एकूण ५५ हजार ८८३ रुग्णांनी कोरोनावर मात करण्यात यश मिळवले आहे.

Coronavirus Cases : मुंबईत कोरोनाचे १३११ नवे रुग्ण, दिवसभरात १५१ जणांचा बळी
SHARES

मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. आज राज्यात कोरोनाचे १५१ जणांचा बळी गेल्याची नोंद करण्यात आली आहे. तर मुंबईत दिवसभरात १३११ नवीन रुग्ण आढळल्याने कोरोनाशी दोन हात करणाऱ्या अत्यावश्यक सेवांवरील भार दिवसेंदिवस वाढतच आहे. मुंबईत रविवारी दिवसभरात ६९ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात कोरोनाबाधीत रुग्णांमध्ये मुंबई दुसऱ्या क्रमांकावर आहे.

हेही वाचाः- Transfers of IPS and SPS officers canceled सरकारचा प्रशासकिय गोंधळ सुरूच, IPS  आणि SPS अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश मागे

मागील दिवसांपासून मुंबईत कोरोनाचा मृत्यूदर दिवसेंदिवस वाढत आहे. मृतांच्या एकूण संख्येत रविवारी भर पडली आहे. मुंबईत गेल्या २४ तासांत कोरोनाचे ६९ रुग्ण दगावले आहेत. तर ४ जून रोजी ६८ मृत व्यक्तींची नोंद झाली आहे. त्या पूर्वी ३ जून रोजी रोजी एकूण ७३ जण या आजाराला बळी पडल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले आहे. या शिवाय, रविवारी मुंबईत कोरोनाचे १३११ नवीन रुग्ण आढळले आहेत. मुंबईत रुग्णांची एकूण संख्या आता ८३ हजार १२५ इतकी झाली आहे. मुंबईत मागील २४ तासात  करोनाचे २४२० रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आतापर्यंत कोरोनाची लागण झालेल्या एकूण ५५ हजार ८८३ रुग्णांनी कोरोनावर मात करण्यात यश मिळवले आहे. त्यामुळं मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे.

हेही वाचाः- Keep an identity card in your pocket घराबाहेर पडताना खिशात ओळखपत्र ठेवा, अन्यथा पोलिस कारवाईला सामोरे जा

राज्यात आज कोरोनाच्या ६५५५ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात ८६ हजार ४० रुग्णांवर (ॲक्टीव्ह) उपचार सुरू आहेत. आज ३६५८ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून एकूण संख्या १ लाख ११ हजार ७४० झाली आहे. राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५४.८ टक्के एवढे आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ११ लाख  १२ हजार ४४२ नमुन्यांपैकी २ लाख ६ ६१९ नमुने पॉझिटिव्ह (१८.५७ टक्के) आले आहेत. राज्यात ६ लाख ४ हजार  ४६३ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ४६ हजार ६२ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज १५१ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ४.२७ टक्के एवढा आहे.

राज्यात नोंद झालेले १५१ मृत्यू हे मुंबई मनपा-६९, ठाणे-१ ठाणे मनपा-३, कल्याण-डोंबिवली मनपा-८, भिवंडी निजामपूर मनपा-३, मीरा-भाईंदर मनपा-१, वसई-विरार मनपा-४, नाशिक-२, धुळे-४,जळगाव-६,जळगाव मनपा-४, पुणे-३, पुणे मनपा-२०, पिंपरी-चिंचवड मनपा-८, सोलापूर मनपा-४, औरंगाबाद-१, औरंगाबाद मनपा-१० या जिल्हा आणि मनपा क्षेत्रातील आहे.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा