Transfers of IPS and SPS officers canceled सरकारचा प्रशासकिय गोंधळ सुरूच, IPS आणि SPS अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश मागे

दोन दिवसात असे काय घडले की, बजाज यांना त्यांनी पारित केले आदेश त्यांना त्यांच्यात स्वाक्षरीने मागे घ्यावे लागले.

Transfers of IPS and SPS officers canceled सरकारचा प्रशासकिय गोंधळ सुरूच, IPS  आणि SPS अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश मागे
SHARES

कोरोनाच्या काळात मुंबईत २ किलोमीटर अंतराच्या आत फिरण्याचा निर्णय मागे घेण्याची वेळ मुंबई पोलिसांवर आली असतानाच, २ दिवसांपूर्वी जाहिर केलेल्या IPS आणि SPS अधिकाऱ्यांच्या बदलीबाबतचा निर्णय सह आयुक्त नवल बजाज यांनी  मागे घेतला आहे. या निर्णयामुळे मुंबई पोलिस दलात सध्या उलट सुलट चर्चांना उधान आले आहे.

हेही वाचाः- मुंबईत पावसाची संततधार; मागील २४ तासांत 'इतकी' नोंद

मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी अत्यावश्यक सेवेतील डाँक्टरांच्या खांद्याला खांदा लावून पोलिस ही मोठ्या शर्तीने शहरातील कायदा व सुव्यवस्था हाताळत आहेत. मागील अनेक दिवसांपासून अनेक आयपीएस आणि एसपीएस अधिकाऱ्यांचा कार्यकाळ हा संपन्न झाला होता. मात्र कोरोनामुळे त्यास विलंब लागल्याने २ जुलै रोजी मुंबईतील १२ अधिकाऱ्यांच्या बदल्याचे आदेश जारी केले. सह पोलिस आयुक्त नवल बजाज यांच्या स्वाक्षरीने हे आदेश पारित करण्यात आले होते. मात्र दोन दिवसात असे काय घडले की, बजाज यांना त्यांनी पारित केले आदेश त्यांना त्यांच्यात स्वाक्षरीने मागे घ्यावे लागले.

हेही वाचाः- Keep an identity card in your pocket घराबाहेर पडताना खिशात ओळखपत्र ठेवा, अन्यथा पोलिस कारवाईला सामोरे जा

दरम्यान या बदलीमुळे पोलिस उपायुक्तांमध्येही नाराजीचे वातावरण असून पोलिस दलात या बदलीचे आदेश मागे घेण्याची चर्चा सुरू आहे. परिमंडळ ३ चे पोलिस उपायुक्त अविनाश कुमार आणि परिमंडळ ५ चे पोलिस उपायुक्त नियती ठाकरे दवे यांना केंद्रीय प्रतिनियुक्तीवरील नियुक्तीच्या ठिकाणी हजर होण्याकरता कार्यमुक्त करण्यात आल्याने त्याच्या पदाचा भार  म्हणजेच परिमंडळ ३ चा पदभार हा पोलिस उपायुक एन अंबिका आणि परिमंडळ ५ चा पदभार हा पोलिस उपायुक्त प्रणय अशोक यांच्याकडे पुढील आदेशापर्यंत सोपवण्यात आला आहे. तर उर्वरित १० पोलिस उपायुक्तांना त्यांच्या पूर्वीच्या ठिकाणंचा कार्यभार स्विकारण्याचे आदेश सह पोलिस आयुक्त नवल बजाज यांच्या स्वाक्षरीनेच पारित करण्यात आले आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा