Advertisement

ठाण्यात मुंबईपेक्षा कोरोनाचे अ‍ॅक्टिव्ह रुग्ण अधिक

अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या मुंबईपेक्षा ठाण्यात जास्त झाली आहे. दिवसेंदिवस ठाणे जिल्ह्यातील कोरोना रुग्णांचा आकडा मोठ्या प्रमाणावर वाढत आहे.

ठाण्यात मुंबईपेक्षा कोरोनाचे अ‍ॅक्टिव्ह रुग्ण अधिक
SHARES

ठाणे शहरासह जिल्ह्यात कोरोनाचा फैलाव वेगाने होत असल्याचं दिसून येत आहे. दिवसेंदिवस ठाणे जिल्ह्यातील कोरोना रुग्णांचा आकडा मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. अ‍ॅक्टिव्ह रुग्णसंख्येत आता ठाणे जिल्ह्याने मुंबईला मागं टाकल्याचं दिसून येत आहे. अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या मुंबईपेक्षा ठाण्यात जास्त झाली आहे. सध्या मुंबईत २४,९१२ तर ठाण्यात २५,३३१ अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. 

 ठाणे जिल्ह्यातील नवी मुंबई, उल्हासनगर, कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. त्यामुळे या महापालिकांच्या क्षेत्रांमध्ये लाॅकडाऊन करावा लागला आहे. ठाणे शहरातही वाढत्या रुग्णसंख्येमुळे पुन्हा लॉकडाऊन करण्याची वेळ आली आहे. 

 मुंबईत कोरोनाचे एकूण ८२,०७४ रुग्ण आहेत. तर ठाणे जिल्ह्यातील रुग्णांची संख्या ४३,६३४  झाली आहे. ठाण्यातील कोरोना मृत्यूंची संख्या आता १०७५ वर गेली आहे.  ठाणे जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत शुक्रवारी नव्याने २ हजार २७ ने भर पडली. कल्याण-डोंबिवलीमध्ये ५५० तर ठाणे शहरात ४२० नवीन रुग्ण आढळले. 

नवी मुंबईमध्ये शुक्रवारी २५७ रुग्ण आढळल्याने एकूण रुग्णांची संख्या ७ हजार ३४५ वर गेली आहे. तर आतापर्यंत २३२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मिरा-भाईंदरमध्ये २५७ रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे येथील रुग्णसंख्या ३ हजार ८८५ वर गेली आहे.हेही वाचा -

मुसळधार पावसामुळे मुंबईतील 'हे' रस्ते बंद

पीपीई कीटमध्येच डॉक्टर तरुणी थिरकली ‘हाय गर्मी’वर, पहा हा भन्नाट डान्स
Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा