coronavirus Test : तपासणी करताना 'या' ५ गोष्टी लक्षात ठेवा

महाराष्ट्रात कोरोना विषाणूपासून प्रभावित लोकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सोमवारी महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा ८९ च्या घरात पोहोचला. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत. महाराष्ट्रात १४४ लागू करण्यात आला आहे. तर ट्रेन आणि बसमध्ये सामान्य नागरिकांसाठी बंदी घालण्यात आली आहे.

उद्धव ठाकरे सरकारनं आरोग्य सेवांमध्ये देखील बरीच सुधारणा केली आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता राज्य सरकारनं कोरोनाच्या चाचणीसाठी लागणाऱ्या लॅबची संख्या वाढवली आहे. सुरुवातीला मुंबईत फक्त कस्तुरबा रुग्णालयात कोरोनाची चाचणी केली जात होती. आता तीन-चार ठिकाणी लॅब सुरू करण्यात आल्या आहेत. येत्या काळात अधिक लॅब उभारल्या जातील जेणे करून जास्त नागरिकांच्या तपासण्या करता येतील.

तुमच्यापैकी कुणी कोरोना चाचणी करण्याचा विचार करत असाल तर त्याआधी हे ५ मुद्दे लक्षात ठेवा.

१) कशी करतात कोरोनाची तपासणी?

इंडियन काउंसिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) यांच्यानुसार, यासाठी पॉलीमरेज चेन रिएक्शन (पीसीआर) ही चाचणी केली जाते. ही चाचणी फक्त मोठ्या लॅबमध्येच केली जाते. पीसीआर चाचणीत गळ्यातील, श्वास नलीकेतील आणि तोडांतील लाळ तपासली जाते. यात कुठल्याही प्रकारची रक्त तपासणी केली जात नाही. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, नाक आणि गळ्याच्या भागांमध्ये विषाणूंचा धोका अधिक असतो. सॅमपलमध्ये काही कोशिका घेतल्या जातात. याला स्लॅब कोस सल्युशनमध्ये टाकले जाते. त्यातून कोशिका वेगळ्या होतात.

२) काय आहेत लक्षणं?

डोकेदुखी

नाक गळणे

खोकला

घसा खवखवणे

ताप

अस्वस्थ वाटणे

शिंका येणे, धाप लागणे

थकवा जाणवणे

न्युमोनिया, फुप्फुसात सूज

३) कधी कराल तपासणी?

कोरोना व्हायरसच्या चाचणीसाठी ट्रॅव्हल हिस्ट्रीची तपासणी केली जाते. तुम्ही भारताबाहेरून म्हणजे परदेशातून आला असाल आणि तुमच्यात वरील लक्षणं जाणवत असतील तर तुमची तपासणी केली जाते. याशिवाय परदेशातून आला असाल आणि लक्षण आढळलं नाही तर त्यांना क्वारंटाईन राहण्याचा सल्ला दिला जातोय. याशिवाय तुम्ही एखाद्या कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात आला असाल तर त्यांची चाचणी केली जाते.

४) प्रथम आपल्या डॉक्टरांचा सल्ला

जर तुमच्यात ताप, सर्दी, सुखा खोकला अशी लक्षणं आढळली तर जवळील डॉक्टरशी संपर्क साधा. औषध देऊन सुद्धा काही सुधारणा नसेल तर तुम्हाला डॉक्टरांकडून चाचणीचा सल्ला दिला जाईल. त्यानंतरच तुम्ही कोरोनाची चाचणी करू शकता. एक लक्षात ठेवा की, जर तुमची स्वत:ची ट्रॅवल हिस्ट्री नसेल, तुम्ही एखाद्या कोरोनाबाधित व्यक्तीच्या संपर्कात आला नसाल आणि जर तुम्ही कोरोना झाल्याच्या संशयावरून क्वारंटाईन नसाल तर तुमची तपासणी केली जाणार नाही.

५) जास्त पैसे न घेण्याचे आदेश

सरकारनं खाजगी रुग्णालयात आदेश दिले आहेत की, कोरोनावायरसच्या तपासणीसाठी जास्तीत जास्त ४ हजार ५०० रुपये आकारू शकता. त्याहून अधिक पैसे आकारण्यास मनाई आहे. संशयित रुग्ण असेल तर त्याच्या तपासणीसाठी १ हजार ५०० रुपये आकारले जातील. कोरोना रुग्ण असेल तर त्याच्या चाचणीसाठी ३ हजार रुपये आकारले जातील. केंद्रीय आरोग्य मंत्रालयातर्फे सांगण्यात आलं आहे की, या नियमांचं उल्लंघन करताना कुणी आढळलं तर त्या रुग्णालया विरोधात कठोर कारवाई केली जाईल.


हेही वाचा

Coronavirus Updates: 'या' रुग्णालयांत आता 'कोव्हीड १९'ची आरोग्यसेवा केंद्रे

पुढील बातमी
इतर बातम्या