जे.जे रुग्णालयात पहिली यशस्वी मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रिया

जे.जे रुग्णालयात नुकतीच पहिली यशस्वी मूत्रपिंड शस्त्रक्रिया करण्यात आली. कर्जतच्या ताराबाई पवार यांना डॉक्टरांनी ब्रेनडेड घोषित केल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी अवयवदान करण्याचा निर्णय घेतला. त्यांचं मूत्रपिंड मुंबईतील ३४ वर्षीय यासीर सय्यद यांना दान करण्यात आलं.

सहा महिन्यांपूर्वी यासीर सय्यद यांचं मूत्रपिंड निकामी झालं होतं. त्यांना ७ वर्षांपासून मूत्रपिंडाचा त्रास होता. उपचारादरम्यान त्यांना क्षयरोगाचंही निदान झालं. त्यानंतर त्यांची दोन्ही मूत्रपिंडं निकामी झाली. यासीर यांना एप्रिल महिन्यात जे. जे. रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं होतं.

यासीर यांना प्रत्यारोपणाशिवाय दुसरा कुठलाच पर्याय नसल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. त्यानुसार यासीरच्या कुटुंबीयांनी अवयव प्रत्यारोपण यादीत नाव नोंदवलं. त्यानंतर ७ महिने ते अवयवदानाच्या प्रतिक्षेत होते.

आम्ही यासीरसाठी मूत्रपिंडाच्या प्रतिक्षेत होतो. ४ सप्टेंबरला जे. जे. रुग्णालयातून डॉक्टरांचा मूत्रपिंड उपलब्ध झाल्याचा फोन आला. रुग्णालयात डॉक्टरांनी प्रत्यारोपणाची संपूर्ण तयारी करून ठेवली होती. फार कमी वेळात डॉक्टरांनी प्रत्यारोपण करून माझ्या भावाचे प्राण वाचवले.

- सदफ सय्यद, यासीरचा भाऊ

यासीरच्या मोठ्या भावाचं देखील १० वर्षांपूर्वी मूत्रपिंड निकामी झालं होतं. आईनेच त्याला मूत्रपिंड दिल्यानं त्याच्यावर प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आली होती. पण, यावेळी ब्रेनडेड रुग्णांकडून अवयव घेऊन यासीरचे प्राण वाचविण्यात आले.


हे देखील वाचा -

'तिनं' गिळले ७५० ग्रॅम केस!

मृत्यूनंतरही ठेवला सामाजिक वसा कायम, जेजेत दुसरं कॅडेव्हरीक अवयवदान


डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

पुढील बातमी
इतर बातम्या