Advertisement

मृत्यूनंतरही ठेवला सामाजिक वसा कायम, जेजेत दुसरं कॅडेव्हरीक अवयवदान


मृत्यूनंतरही ठेवला सामाजिक वसा कायम, जेजेत दुसरं कॅडेव्हरीक अवयवदान
SHARES

सर. जे. जे. रुग्णालयात मंगळवारी दुसरे कॅडेव्हरीक अवयवदान आणि पहिली यशस्वी किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यामुळे सहा जणांना जीवदान मिळाले आहे.

कर्जत येथे राहणाऱ्या ताराबाई पवार यांना सोमवारी ब्रेनडेड घोषीत करण्यात आले. 45 वर्षीय ताराबाई पवार यांच्यामुळे सहा जणांना जीवदान मिळाले आहे. 5 दिवसांपूर्वी त्यांच्या मेंदूचा रक्तपुरवठा अचानक थांबल्याने त्या बेशुद्ध अवस्थेत होत्या. 2 सप्टेंबरला त्यांना बेशुद्ध अवस्थेतच जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्यांना ब्रेनडेड घोषीत केल्यानंतर खरी कसरत होती ते त्यांच्या कुटुंबियांना अवयवदानासाठी तयार करण्यासाठी.

खरेतर ताराबाई या कर्जतमधील कसाळे गावातही सामाजिक कार्य करत होत्या. त्यामुळे त्यांनी मरणानंतरही सहकार्य करण्याचा वसा कायम राखला.
- श्रावण पवार, ताराबाई यांचे पती

श्रावण पवार हे कसाळे या गावात कपड्यांना इस्त्री करण्याचे काम करतात. त्यांनी तसेच त्यांचा भाऊ अंकुश मोहीते आणि मुलगा गणेश यांनी ताराबाईंचे अवयवदान करण्यास संमती दिली.

ताराबाई पवार यांचे हृदय फोर्टिस रुग्णालयातीलच एका रुग्णाला देण्यात आले. तर, लिव्हर अपोलो रुग्णालयात, एक किडनी ज्युपिटर आणि दुसरी किडनी आणि दोन्ही डोळे जे. जे रुग्णालयात उपचार घेत असलेल्या एका रुग्णाला प्रत्यारोपण करण्यात आले.

श्रावण पवार हे खरेतर अशिक्षीत आहेत. इस्त्री करून पोटाची खळगी ते भरून काढतात. अवयवदानाविषयी अजिबात माहिती नसताना त्यांनी हा मोठा निर्णय आपल्या कुटुंबियांसोबत घेतला. डॉ. तात्याराव लहाने यांच्या नेतृत्वाखाली हे अवयवदान करण्यात आले.


हेही वाचा - 

फोर्टिसमध्ये 4 तासांत दोन ह्रदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया

...अखेर आराध्याला हृदय मिळाले


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा