मुंबईचं ह्रदय थेट चेन्नईला रवाना, अवयवदानातून मिळालं जीवदान!

अवयवदानाबाबत दिवसेंदिवस जनजागृती वाढल्याचं पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रानं अवयवदानात आणखी एक पाऊल पुढे टाकलं आहे. मुंबईच्या अपोलो रुग्णालयात झालेल्या अवदानातील ह्रदय पहिल्यांदाच राज्याबाहेर पाठवण्यात आलं आहे. गुरुवारी दुपारी हे ह्रदय चेन्नईला पाठवण्यात आलं.

अपोलो रुग्णालयात उपचार घेणाऱ्या 43 वर्षीय व्यक्तीला ब्रेनडेड घोषित केल्यानंतर कुटुंबियांनी अवयवदान करण्याचा निर्णय घेतला. पण, त्याचे इतर अवयव दान करण्यासाठी सक्षम नव्हते. म्हणून त्यांनी ह्रदय दान करण्याचा निर्णय घेतला.

ह्रदय दानासाठी मुंबईत योग्य रुग्ण नसल्याने थेट चेन्नईला हे ह्रदय पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला. ‘नॅशनल ऑर्गन अॅण्ड टिश्यू ट्रान्सप्लान्ट’ समितीच्या मध्यस्थीने चेन्नईतील रुग्णाला हृदय देण्याचा निर्णय घेण्यात आला.

गुरुवारी दुपारी 12 वाजून 48 मिनिटांनी ग्रीन कॉरिडोरच्या साहाय्याने हे हृदय 1 वाजून 28 मिनिटांनी मुंबई विमानतळावर आणण्यात आलं. त्यानंतर ते चेन्नईतील फोर्टिस रुग्णालयाकडे रवाना करण्यात आलं.

याआधी आराध्यासाठी सुरतहून मुंबईत हृदय आणण्यात आलं होतं.


हेही वाचा -

चिमुरडीचं ह्रदय ठरलं त्याच्यासाठी जीवदान!

पुढील बातमी
इतर बातम्या