अपोलो रुग्णालयात झालं मुंबईतलं 46वं कॅडेवर डोनेशन!


SHARE

नेरुळमध्ये राहणाऱ्या मिनाक्षी सातपुते या 34 वर्षीय महिलेचे अवयवदान करण्यात आले आहेत. त्यांनी केलेल्या अवयवदानामुळे 4 जणांना जीवदान मिळाले आहे. अवयवदानाबाबत सुरू असलेल्या जनजागृतीमुळे मीनाक्षी यांच्या पतीने तत्काळ अवयवदान करण्याचा निर्णय घेतला. यात त्यांचे ह्रदय, यकृत आणि दोन्ही मूत्रपिंड दान करण्यात आले आहेत. मुंबईतील अपोलो रुग्णालयात 10 ऑक्टोबरला ही शस्त्रक्रिया पार पडली.


नेमकं काय घडलं ?

या मीनाक्षी यांना अचानक चक्कर आल्याने आधी डी. वाय. पाटील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. वैद्यकीय तपासणी केली असता त्यांच्या मेंदूत रक्ताच्या गाठी तयार झाल्या असल्याचं आढळून आलं. त्यामुळेच त्यांना वारंवार चक्कर येत असल्याचंही डॉक्टरांनी सांगितलं. त्यांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आलं होतं. पण, मेंदूत रक्तस्त्राव होऊ लागल्याने उपचारांपूर्वीच त्यांना ब्रेनडेड घोषित करण्यात आलं. पण, कुटुंबियांनी त्यावर विश्वास न ठेवता त्यांना अपोलो रुग्णालयात दाखल केलं. पण, त्यांची अपोलो रुग्णालयाच्या डॉक्टरांनी तपासणी केली असता 9 ऑक्टोबरला त्यांना ब्रेनडेड घोषित केलं.

ही महिला आधीच कोमामध्ये गेली होती. खूप प्रयत्न करुनही आम्ही त्यांना वाचवू शकलो नाही. त्यानंतर आम्ही त्यांना ब्रेनडेड घोषित केलं. त्यांच्या कुटुंबियांना समजावल्यानंतर आम्ही तत्काळ त्यांचे अवयवदान केले. 

डॉ. गिरीष नायर, न्यूरोलॉजी सल्लागार, अपोलो हॉस्पिटल


महिलेची आर्थिक परिस्थिती बिकट

महिलेचे पती खासगी गाडी चालवतात. यातून मिळणाऱ्या पैशातून त्यांचं घर चालतं. त्यांना एक 12 वर्षांचा मुलगा आणि अडीच वर्षांची मुलगी आहे.

या महिलेच्या पतीच्या परवानगीनुसार, हदय, यकृत आणि दोन्ही मूत्रपिंड दान करण्यात आले आहेत. महिलेचं हृदय मुलुंडच्या फोर्टिस रूग्णालयात दान करण्यात आलं. तर, यकृत अपोलो रूग्णालयात उपचार सुरू असलेल्या एका रूग्णाला दान करण्यात आलं. एक मूत्रपिंड अपोलो रूग्णालयात तर दुसरं मूत्रपिंड नानावटी रूग्णालयात पाठवण्यात आलं.

नानावटी रुग्णालयात दान करण्यात आलेलं मूत्रपिंड एका 45 वर्षीय महिलेला दान करण्यात आलं आहे. त्या गेल्या 3 वर्षांपासून डायलेसिस वर होत्या.हेही वाचा

वडिलांची इच्छा जपली - मुलीने दुखातही घेतला अवयवदानाचा निर्णय


संबंधित विषय