Advertisement

वडिलांची इच्छा जपली - मुलीने दुखातही घेतला अवयवदानाचा निर्णय


वडिलांची इच्छा जपली - मुलीने दुखातही घेतला अवयवदानाचा निर्णय
SHARES

वडीलांच्या जाण्याने सर्व कुटुंबियांवर दुखाचा डोंगर कोसळला होता. पण, वडील कायम सोबत राहतील, या आशेने मुलीने आपल्या वडिलांचे अवयवदान करण्याचा निर्णय घेतला.

खरंतर, सध्या अवयवदानाबाबतची जनजागृती वाढली आहे, असं म्हणायला काही हरकत नाही. कारण त्याचा प्रत्यय आणून दिला आहे एका 78 वर्षांच्या आजोबांनी...गोपालन कोरथ यांनी मरणाआधी अवयवदान करण्याचा निर्धार केला होता. त्यांनी अवयवदानासंबंधी फॉर्मही भरला होता. रुग्णालयात दाखल केल्यानंतर गोपालन यांनी ही माहीती आपल्या कुटुंबियांना दिली. त्यानुसार, डॉक्टरांनी आणि कुटुंबियांनी त्याचं अवयवदान केलं. त्यातून दोघांचा प्राण वाचला आहे.

मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या गोपालन यांना वसईत एका सायकलस्वाराने जबर धडक मारली. या धडकेत त्यांच्या डोक्याला जबर मार बसला. त्यांना वसईतील एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांच्यावर प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना वोक्हार्ट या रुग्णालयामध्ये दाखल केलं.  

पण, उपचारादरम्यान त्यांना वोक्हार्ट रुग्णालयातील डॉक्टरांनी ब्रेनडेड घोषित केलं. पण, गोपालन हे जेव्हा शुद्धीवर होते, तेव्हा त्यांनी आपल्या मुलीकडे अवयवदान करण्याची इच्छा बोलून दाखवली. त्यानंतर, सर्व कुटुंबियांनी डॉक्टरांच्या मदतीने त्यांचे अवयवदान करण्याचा निर्णय घेतला.  

ब्रेन डेडच्या रुग्णांमध्ये दोन्ही किडन्या दोन रुग्णांना देऊन त्यांचे प्राण वाचवता येतात. गोपालन यांचं वय पाहता त्यांची त्यांच्या दोन्ही किडन्या या एकाच व्यक्तीला देण्यात आल्या. मालाड येथे राहणाऱ्या 50 वर्षीय रुग्णाला या किडन्या प्रत्यारोपण करण्यात आल्या असून आता त्यांची प्रकृती उत्तम असून नैसर्गिकरीत्या लघवीची प्रकिया सुरु झाली आहे. गेली 3 वर्षे ते डायलासिसवर होते.

डॉ. राजेश कुमार, किडनी प्रत्यारोपण शल्य चिकित्सक, वोक्हार्ट  हॉस्पिटल



गोपालन यांच्या वयाचा विचार करता त्यांचे यकृत चांगले कार्यरत होते. यकृताच्या आजाराने त्रस्त असलेल्या मुंबईतील एका 56 वर्षीय रुग्णावर यकृत प्रत्यारोपण करण्यात आलं असून त्यांची प्रकृतीत चांगली सुधारणा होत आहे.

डॉ. अनुराग श्रीमल, यकृत प्रत्यारोपण शल्यचिकित्सक



किडनीच्या आणि यकृताच्या विविध आजारांनी ग्रस्त लाखो रुग्ण देशात दरवर्षी दगावतात. त्या तुलनेत प्रत्यारोपणाची संख्या जेमतेम पाच टक्के म्हणजेच तीन ते साडेतीन हजार आहे. रस्ते अपघातांमध्ये दरवर्षी 1 लाख 60 हजार जण प्राण गमावतात. त्यापैकी 70 टक्के अपघाती रुग्ण ब्रेनडेड असतात.


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा