कोव्हिडमधून बरं झाल्यानंतर हृदयाची काळजी कशी घ्याल?

कोव्हिडमधून बरे झाल्यानंतरही रुग्णांना वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे नागरिकांच्या चिंतेत अधिकच भर पडली आहे. आतापर्यंत कोविड झालेल्या रुग्णांच्या फुफ्फुसावर परिणाम होत असल्याचं पाहायला मिळालं.

पण आता कोविडमधून बरे झालेल्या रुग्णांच्या हृदयावरही परिणाम होत असल्याचं समोर येत आहे. मात्र, ही भीती दूर व्हावी, यासाठी कोव्हिडनंतर कोणकोणते शारीरिक त्रास होऊ शकतात? आणि त्यात काय काळजी घेतली पाहिजे, हे जाणून घेऊया.

कोविडमध्ये हृदयावर परिणाम?

  • हृदय हे शरीराचं पम्पिंग स्टेशन आहे. हृदयातूनच संपूर्ण शरीरात ऑक्सिजन पुरवला जातो आणि कार्बनडायऑक्साईड शरीराबाहेर फेकला जातो. फुफ्फुसातून ऑक्सिजन हृदयात जातो. तिथून हा ऑक्सिजन रक्तात मिसळून हे ऑक्सिजनयुक्त रक्त संपूर्ण शरीरात प्रवाहित होतं.
  • कोरोना विषाणूचा संसर्ग हा थेट फुफ्फुसावर आघात करतो. त्यामुळे फुफ्फुसांच्या क्षमतेवर परिणाम होऊन ऑक्सिजनची पातळी कमी होऊ लागते.
  • काही रुग्णांमध्ये ऑक्सिजनच्या कमतरतेचा हृदयावरही परिणाम होऊ शकतो. अशावेळी ऑक्सिजनयुक्त रक्त पम्प करण्यासाठी हृदयाच्या स्नायूंवर अधिक ताण येतो. याचा थेट परिणाम हृदयाच्या पेशींवर होतो.
  • हृदयाचे ठोके वेगानं पडतात. त्यामुळे हृदयाची रक्त पम्प करण्याची क्षमता कमी होते. ज्यांना हृदयासंबंधी आधीच काही आजार असतील त्यांना याचा त्रास होऊ शकतो.

हृदयावर परिणाम झाला आहे की नाही, हे कसं ओळखणार?

  • कोविडच्या रुग्णाला श्वास घ्यायला त्रास होणे
  • छातीत दुखणे
  • अचानक अधून-मधून धडधड होणे

अशा परिस्थिचीच डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.

कुठल्या टेस्ट कधी कराव्यात?

  • कोरोना विषाणू थेट हृदयावर परिणाम करत नाही. मात्र, सीआरपी आणि डी-डायमर वाढू लागतात.
  • त्यामुळे डी-डायमर, सीबीसी-सीआरपी, आई-एल6 यासारख्या चाचण्या ७-८ दिवसांनंतरच करण्याचा सल्ला दिला जातो.
  • रिपोर्टवरून कुठल्या रुग्णाला कधी हॉस्पिटलमध्ये भर्ती करायचं, हे ठरवलं जातं.
  • त्यानंतर शरीरातला कुठला भाग विषाणूच्या जाळ्यात ओढला जातोय, कोणतं औषध द्यायचं, हे ठरवलं जातं.

हृदयाची काळजी कशी घ्यावी?

  • डॉक्टरांनी ब्लड थिनर आणि इतर जी काही औषधं लिहून दिली आहेत आणि जेवढ्या कालावधीसाठी लिहून दिली आहेत ती वेळेवर गेणं.
  • धूम्रपान करत असाल किंवा ड्रिंकची सवय असेल तर कोव्हिडनंतर लगेच या सवयी सोडा
  • आहाराकडे विशेष लक्ष द्या. फळं आणि हिरव्या भाज्या भरपूर प्रमाणात खा. घरचं आणि ताजं अन्न खा.
  • भरपूर पाणी प्या. शरीरात पाण्याचं प्रमाण कमी झाल्यास रक्तात गुठळ्या होण्याची शक्यता वाढते.
  • हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाल्यावर दोन आठवड्यांनी डॉक्टरांकडे फॉलो-अप चेकअपसाठी जरूर जावे.
  • गरज असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ईसीजी, इको-कार्डियोग्राम करून घ्यावा.
  • हॉस्पिटलमधून घरी आलेल्या रुग्णांनी हळू-हळू आणि हलके व्यायाम करावे.
  • दिवसभर बिछान्यावर पडून राहणंही योग्य नाही. जेव्हा बरं वाटेल तेव्हा आपल्या खोलीतच थोड्या चकरा माराव्या. योग करावा आणि सकारात्मक विचार करावा.


हेही वाचा

ब्लॅक आणि व्हाईटनंतर आता यलो फंगसचा धोका, 'ही' आहेत लक्षणं

पुढील बातमी
इतर बातम्या