Advertisement

ब्लॅक आणि व्हाईटनंतर आता यलो फंगसचा धोका, 'ही' आहेत लक्षणं

देशात यलो फंगसचा पहिला रुग्ण सापडला आहे. त्यामुळे कशी काळजी घेतली पाहिजे हे जाणून घेऊयात.

ब्लॅक आणि व्हाईटनंतर आता यलो फंगसचा धोका, 'ही' आहेत लक्षणं
SHARES

देशात ब्लॅक फंगस (Black Fungus) आणि नंतर व्हाइट फंगसचं (White Fungus) संकट उभं ठाकलं आहे. हे कमी की काय म्हणून आता यलो फंगसचंही (Yellow fungus) नवं संकट ओढावलं आहे. देशात यलो फंगसचा पहिला रुग्ण सापडला आहे.


यलो फंगसचा धोका

उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये यलो फंगसचं पहिलं प्रकरण दिसून आलं आहे. ४५ वर्षांच्या व्यक्तीला यलो फंगसचा संसर्ग झाला आहे. यलो हा फंगस ब्लॅक आणि व्हाइटपेक्षाही अधिक भयंकर असल्याचं सांगितलं जातं आहे.

कान-नाक-घसा तज्ज्ञ डॉ. बीपी त्यागी यांनी सांगितलं, सीटी स्कॅनमध्ये ४५ व्यक्तीचं सायनस सामान्य होतं. पण जेव्हा आम्ही एन्डोस्कोपी केली तेव्हा त्याला ब्लॅक, व्हाइट आणि यलो असे तीन प्रकारचे फंगल इन्फेक्शन असल्याचं समजलं.


कोणामध्ये आढळतो यलो फंगस?

सामान्यपणे यलो फंगस सरपटणाऱ्या प्राण्यांमध्ये आढळतं. पहिल्यांदाच हे माणसांमध्ये दिसून आलं आहे. कोणत्याही जनरलमध्ये याबाबत काही माहिती नाही. हा संसर्ग Amphotericin B नं बरा होऊ शकतो, पण व्हाइट आणि ब्लॅक फंगसच्या तुलनेत यलो फंगसमध्ये जखम बरी होण्यास वेळ लागतो.


लक्षणं कोणती?

पिवळा फंगस हा एक जीवघेणा रोग आहे. कारण त्याची सुरुवात आंतरिकरित्या होते आणि म्हणूनच आपल्याला लक्षणं दिसल्यास उपचार सुरू करणं महत्त्वाचं आहे.

  • थकवा
  • कमी भूक किंवा भूक न लागणे
  • वजन कमी होणं
  • जखम बरी होण्यास वेळ लागणं
  • डोळे आत जाणं


पिवळ्या बुरशीचा आजार कसा होतो?

अस्वच्छतेमुळेही हा आजार होऊ शकतो. त्यामुळे स्वच्छता राखा. शिळं किंवा खराब अन्न जास्त काळ ठेवू नका. आपल्या आजूबाजूस जास्त घाण पिवळ्या बुरशीचे मुख्य कारण असू शकते. म्हणूनच, आपल्या घराभोवती स्वच्छता ठेवणे महत्त्वाचं आहे. जेणेकरून बॅक्टेरिया किंवा बुरशीचा विकास होणार नाही.


पिवळ्या बुरशीपासून बचाव

  • जर आपल्याला पिवळ्या बुरशीची कोणतीही लक्षणं दिसली तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. डॉक्टरांचा सल्ला घ्या. आवश्यकतेनुसार उपचार घ्या. 
  • आद्रता बुरशीच्या वाढिस कारणीभूत आहे.  
  • बंद घर जास्त आर्द्रता बॅक्टेरिया आणि बुरशीच्या वाढीस प्रोत्साहन देतं. म्हणून हवेशीर ठिकाणी राहण्याचा प्रयत्न करा. 
  • रोग प्रतिकारशक्ती मजबूत ठेवण्यासाठी प्रयत्न करा. रोग प्रतिकारशक्ती चांगली असेल तर ही बुरशीजन्य आजार टाळला जाऊ शकतो.
  • घरात आणि आपल्या आजूबाजूला स्वच्छता ठेवा. 
  • घरात शिळे अन्न ठेवू नका 



हेही वाचा

मुंबईत रुग्णसंख्येत सातत्याने घट, सोमवारी १ हजार ५७ नवीन रुग्ण

मुंबईतील तीन कोविड सेंटर १ जूनपर्यंत बंद, नवीन रुग्णांना प्रवेश नाही

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा