कारमध्ये एकटं असल्यास मास्क घालणं बंधनकारक आहे का?

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता सर्वांनी मास्क घालणं हे बंधनकारक आहे. तुम्ही कुठेही गेलात तरी मास्क हा हवाच. मास्क न घालणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उचलला जात आहे. पण मास्क घालण्यावरून अनेकांमध्ये संभ्रम आहे. एकट्या व्यक्तीनं गाडी चालवताना मास्क घालावा का? असा प्रश्न अनेकांच्या मनात डोकावत आहे.

जर तुम्ही गाडीत एकटे असाल तर तुम्हाला मास्क घालण्याची आवश्यक्ता नाही. पण तुमच्यासोबत कुणी असेल तर मास्क घालणंच योग्य ठरेल.

याशिवाय हल्ली नागरिक शारीरिक हालचालींवर भर देत आहेत. त्यासाठी सायकल चालवण्यासारख्या व्यायामाला प्राधान्य देत आहेत. परंतु समुहानं सायकल चालवत असाल तर मास्क लावणं गरजेचं आहे.

वाहन चालवताना मास्क न घातल्यानं शेकडो चालकांना दंड आकारण्यात येत होता. यासंदर्भात मोठ्या संख्येनं तक्रारी वाढत होत्या. 

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण यांनी गेल्या वर्षीच यावर स्पष्टीकरण दिलं होत. 'गाडी चालवताना किंवा एकट्याने सायकल चालवताना मास्क घालावा, अशी कोणतीही मार्गदर्शक सूचना सरकारनं दिलेली नाही', असं भूषण यांनी स्पष्ट आहे.


हेही वाचा

कोरोना रूग्णांना येणाऱ्या अडचणींसाठी BMC च्या 'या' क्रमांकावर संपर्क साधा

पुढील बातमी
इतर बातम्या