कोरोनाशी लढण्यापेक्षा, तो होवूच नये यासाठी दक्षता घेण्याची गरज- राजेश टोपे

कोरोनावर प्रभावीपणे नियंत्रण मिळविण्यासाठी राज्यात ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ही मोहीम महत्त्वपूर्ण असल्याचं सांगतानाच  ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ उपक्रमाला सर्वांचा प्रतिसाद महत्वाचा ठरणार आहे. कोरोनाशी लढण्यापेक्षा कोरोना होवूच नये यासाठी प्रत्येकाने दक्षता घेण्याची गरज असल्याचं प्रतिपादन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलं. (maharashtra health minister speaks on coronavirus outbreak)

बाणेर येथील युतिका सोसायटीमध्ये ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ कार्यक्रमात आरोग्यमंत्री राजेश टोपे बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पुणे महापालिका आयुक्त विक्रमकुमार, आरोग्य विभागाच्या संचालक डॉ. अर्चना पाटील, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक नांदापुरकर, डॉ. सुभाष साळुंखे, अतिरिक्त आयुक्त डॉ कुणाल खेमनार, उपायुक्त नितीन उदास, सहाय्यक आयुक्त जयदीप पवार, आरोग्य अधिकारी डॉ. वैशाली जाधव, क्षेत्रीय वैद्यकीय अधिकारी डॉ गणेश डमाळे, नगरसेविका ज्योतीताई कळमकर, बाबुराव चांदेरे, अमोल बालवडकर तसंच संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा - कल्याण डोंबिवलीत ४१३ नवीन कोरोना रुग्ण, ५ जणांचा मृत्यू

आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले, ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेमुळे कोरोनाचे पूर्वनिदान होण्यास मदत होणार आहे. पूर्वनिदान झालं तर मृत्यूचं प्रमाणही कमी होणार आहे. प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचणं या मोहिमेमुळे शक्य होणार आहे. नागरिकांनी आपल्या घरी तपासणी व माहिती, सूचना आदींसाठी येणाऱ्या स्वयंसेवकांना संपूर्ण सहकार्य करावं, असं आवाहनही आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलं.

कोरोना संसर्ग टाळण्यासाठी स्वंयशिस्त महत्त्वाची असल्याचं सांगून आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले, स्वंयशिस्त पाळली तर आपण कोरोनाला रोखू शकतो, कोरोनाशी लढण्यापेक्षा कोरोना होवूच नये यासाठी प्रत्येकाने दक्षता घेण्याची गरज आहे. रोगप्रतिकारशक्ती चांगली ठेवण्यासाठी प्रत्येकाने योग्य ती काळजी घ्यावी. प्रत्येकाने स्वत: सोबत इतरांच्याही आरोग्याची काळजी घेण्याची गरज आहे.  

क्षेत्रीय वैद्यकीय अधिकारी डॉ गणेश डमाळे यांनी परिसरात ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहमे अंतर्गत सुरू असलेल्या उपक्रमाबाबतची माहिती दिली. युतिका सोसायटीच्या प्रतिमा येवलेकर यांनी सोसायटीने हाती घेतलेल्या उपक्रमाबाबत माहिती दिली. यावेळी विविध यंत्रणेचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा - नवी मुंबईत सोमवारी कोरोनाचे नवीन ३४५ रुग्ण

पुढील बातमी
इतर बातम्या