Advertisement

नवी मुंबईत सोमवारी कोरोनाचे नवीन ३४५ रुग्ण

नवी मुंबईत सोमवारी (२१ सप्टेंबर) कोरोनाचे नवीन ३४५ रुग्ण सापडले आहेत. तर ५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

नवी मुंबईत सोमवारी कोरोनाचे नवीन ३४५ रुग्ण
SHARES

नवी मुंबईत सोमवारी (२१ सप्टेंबर) कोरोनाचे नवीन ३४५ रुग्ण सापडले आहेत. तर ५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. येथील एकूण रुग्णांची संख्या आता ३३,४९१ झाली आहे.

सोमवारी बेलापूर ६३, नेरुळ ६५, वाशी ४७, तुर्भे ३४, कोपरखैरणे ३६, घणसोली ५०, ऐरोली ३९, दिघामध्ये ११ नवे रुग्ण आढळले आहेत. दिवसभरात ३६५ जणांनी कोरोनावर मात केली आहे.  बेलापूर ६२, नेरुळ ५७, वाशी ५२, तुर्भे ६०, कोपरखैरणे ५०,  घणसोली ३७, ऐरोली ३९, दिघामधील ८ बरे झाले आहेत.  बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २९२०४ झाली आहे. तर मृतांचा आकडा ७०३ झाला आहे.

नवी मुंबईत सध्या ३५८४ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर कोरोनामुक्तीचा दर ८७ टक्के झाला आहे. शहरात खासगी रुग्णालयातील करोना रुग्णांच्या देयकांच्या तक्रारी मोठय़ा प्रमाणावर वाढल्या आहेत. यासाठी पालिकेने पालिका मुख्यालयातील तळमजल्यावर विशेष तक्रार निवारण कक्ष स्थापन केला आहे. संपर्कासाठी ०२२२/ ७५६७३८९  किंवा ७२०८४९००१० या व्हॉटसअँप क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन केले आहे.


हेही वाचा -
भिवंडीत ३ मजली इमारत कोसळली, ८ जणांचा मृत्यू 
मनसेच्या नेत्यांचा बेकायदा लोकल प्रवास.!



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा