दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या आकड्यामध्ये वाढ होताना दिसत आहे. याचं मुख्य कारण म्हणजे आपल्याकडे होणाऱ्या कोरोनाच्या चाचण्या. कोरोनाच्या चाचण्या अधिक होत असल्यानं कोरोनाच्या रुग्णांचा आकडा वाढत आहे. आता अशी माहिती समोर येत आहे की, सर्वाधिक चाचण्या घेणाऱ्या राज्यांमध्ये महाराष्ट्राचा देखील समावेश झाला आहे.
देशात करोना चाचण्यांची संख्या वाढत आहे. आतापर्यंत ४.३ कोटी पेक्षा जास्त चाचण्या झाल्या आहेत. मागील दोन आठवड्यांमध्ये १ कोटी २२ लाख ५१४ चाचण्या झाल्या आहेत.
हेही वाचा : महापालिकेच्या ३४ शाळा विलगीकरणातून मुक्त
ज्या राज्यांमध्ये करोनाच्या सर्वाधिक चाचण्या होत आहेत, त्यामध्ये तामिळनाडू, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र ही तीन राज्यं अग्रस्थानी आहेत. देशभरात मागील चोवीस तासांमध्ये दहा लाखांपेक्षा जास्त चाचण्या झाल्या आहेत.
देशातील करोनाबाधितांची संख्या ३७ लाखांच्या उंबरठ्यावर पोहचली आहे. तर, करोनामुक्त झालेल्यांची संख्या २८ लाख ३९ हजार ८८२ पोहचली आहे. देशाचा रिकव्हरी रेट ७७ टक्क्यांवर पोहचल आहे. देशातील अॅक्टिव्ह रुग्णांपेक्षा करोनामुक्त होणाऱ्यांची संख्या अधिक आहे.
हेही वाचा