Advertisement

पनवेल महापालिका हद्दीत मंगळवारी १७९ नवीन कोरोना रुग्ण

पनवेल महापालिका हद्दीत मंगळवारी (१ सप्टेंबर) १७९ नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत. १ तर ३ मृत्यूंची नोंद झाली असून यामध्ये खारघरमधील २ आणि खांदा कॉलनी येथील एका रुग्णाचा समावेश झाला आहे.

पनवेल महापालिका हद्दीत मंगळवारी १७९ नवीन कोरोना रुग्ण
SHARES

पनवेल महापालिका हद्दीत मंगळवारी (१ सप्टेंबर) १७९ नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत. १ तर ३ मृत्यूंची नोंद झाली असून यामध्ये खारघरमधील २ आणि खांदा कॉलनी येथील एका रुग्णाचा समावेश झाला आहे. ४७ रूग्ण बरे झाल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.

पनवेल महापालिका हद्दीतील आढळलेल्या नवीन रूग्णांमध्ये पनवेलमधील ३६,  नवीन पनवेलमधील २८, खांदा कॉलनीतील १२, कळंबोली-रोडपाली येथील २०, कामोठ्यातील ३७, खारघरमधील ४५,  तळोजा येथील १ रुग्णांचा समावेश आहे. 

बरे झालेल्या रूग्णांमध्ये पनवेलमधील ११,  नवीन पनवेलमधील १९, कळंबोली-रोडपाली येथील ५५, कामोठ्यातील २३, खारघरमधील ३१,  तळोजा येथील ८ रुग्णांचा समावेश आहे. 

आजपर्यंत नोंद झालेल्या पनवेल महापालिका हद्दीतील एकूण १२००१ कोरोनाबाधित रूग्णांपैकी १०३३० रूग्ण बरे होऊन घरी परतले असून २८८ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या पनवेल महापालिका हद्दीत कोरोनाचे १३८३ ॲक्टीव्ह रूग्ण आहेत. 



हेही वाचा

माहिम आणि दादरमध्ये पालिकेद्वारे मोफत कोरोना अँटिजेन चाचणी

मुंबईत कंटेन्मेंट झोनची संख्या घटून ५५४ वर, 'हे' आहेत कंटेन्मेंट झोन



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा