मीरा- भाईंदरमधील शिवसेना नगरसेवकाचा कोरोनामुळे मृत्यू

कोरोना विषाणूची लागण झालेले  मीरा-भाईंदर येथील शिवसेनेचे नगरसेवक हरिश्चंद आंमगावकर यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.  हरिश्चंद आंमगावर यांना आठवड्यापूर्वी कोरोना विषाणूची बाधा झाली होता. गेल्या आठ दिवसांपासून त्यांच्यावर ठाण्यातील वेदांत या खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. तिथंच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 

त्यांच्या  पत्नी, आई व भावालाही कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्या पत्नीला नुकताच डिस्चार्ज देण्यात आला होता. तर भाऊ आणि आई हे अद्यापही वेदांत हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. 

 हरिश्चंद्र आंमगावकर हे मीरा भाईंदर महानगरपालिकामध्ये दोन टर्म नगरसेवक होते. तर या अगोदर त्यांनी मीरा भाईंदर महापालिकेचे स्थायी समितीचे अध्यक्ष पद देखील भूषवले होते. सध्या ते महानगरपालिका शिवसेनेचे गटनेते म्हणून होते. तर आमदार प्रताप सरनाईक यांचे अत्यंत विश्वासू म्हणून ओळख जात होते.


हेही वाचा -

राज्यात २५५३ नवीन रुग्णांची नोंद, तर दिवसभरात १०९ जणांच्या मृत्यूची नोंद

कोरोनाने मृत्यू झाल्यास मुंबई महापालिका कामगारांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची भरपाई


पुढील बातमी
इतर बातम्या