कर्तव्य बजावताना कोरोनाने मृत्यू पावणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना ५० लाख रुपयांचे सानुग्रह सहाय्य देण्याची योजना लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
कर्तव्यावर असताना मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांचा कोरोनाने मृत्यू झाला तर त्यांच्या वारसांना 50 लाख रुपये नुकसान भरपाई देण्यात येणार आहे. आरोग्य सेवेतच नाही तर पालिकेच्या सर्वच कार्यरत कर्मचाऱ्यांसाठी ही विमा योजना लागू करण्यात आली आहे. काँट्रॅक्टवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही ही योजना लागू असणार आहे.
कर्तव्य बजावताना कोरोनाने
मृत्यू पावणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना ५० लाख रुपयांचे सानुग्रह सहाय्य देण्याची योजना लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला असून महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी या योजनेची घोषणा केली आहे. कोरोनाच्या काळात सेवा देणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याला हा विमा लागू होईल. दिनांक 1 मार्च ते 30 सप्टेंबर 2020 कालावधीसाठी ही योजना लागू करण्यात आली आहे. अशा पद्धतीने कर्मचाऱ्यांचा 50 लाखांचा विमा उतरवणारी ही देशातली पहिली महापालिका असल्याचा मुंबई महापालिकेचा दावा आहे.