Advertisement

ठाणे जिल्ह्यात 5137 रुग्णांची कोरोनावर मात, जिल्ह्यातील 'अशी' आहे रुग्णांची सद्यस्थिती

ठाणे जिल्ह्यातील सर्व महापालिका आणि नगरपालिका क्षेत्रात तसेच ग्रामीण भागात 52 हजार 647 लक्षणे आढळून आलेल्या संशयितांच्या चाचण्या करण्यात आल्या.

ठाणे जिल्ह्यात 5137 रुग्णांची कोरोनावर मात, जिल्ह्यातील 'अशी' आहे रुग्णांची सद्यस्थिती
SHARES

ठाणे जिल्ह्यात आतापर्यंत 10 हजार 419 कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत.  यामधील 5 हजार 137 कोरोना रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सध्या 4 हजार 940 कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. रुग्ण बरे होण्याचं प्रमाण एकूण रुग्ण संख्येच्या 50 टक्के आहे. आतापर्यंत ठाणे 

ठाणे जिल्ह्यातील सर्व महापालिका आणि नगरपालिका क्षेत्रात तसेच ग्रामीण भागात 52 हजार 647 लक्षणे आढळून आलेल्या संशयितांच्या चाचण्या करण्यात आल्या. त्यापैकी 40 हजार 543 संशयितांना चाचणीनंतर कोरोनाची लागण झाली नसल्याचं आढळून आलं.  जिल्ह्यात आतापर्यंत 342 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर अडीच हजार जणांचे अहवाल प्रलंबित आहेत. ठाणे महापालिका क्षेत्रात 2 हजार 12 रूग्ण उपचार घेत असून 1 हजार 670 रूग्ण बरे झाले आहेत. 113 जणांचा मृत्यू झाला आहे. कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात 665 रूग्ण उपचार घेत असून 628 रूग्ण बरे झाले तर  34 जण दगावले. नवी मुंबई महापालिका क्षेत्रात 959 रूग्ण असून 1 हजार 597 उपचाराने बरे झाले तर 87 जणांचा मृत्यू झाला.

मीरा-भाईंदरमध्ये 327 रूग्ण उपचार घेत असून 528 बरे झाले तर 48 जणांचा मृत्यू झाला. उल्हासनगर महापालिका क्षेत्रात 333 रूग्ण उपचार घेत असून 128 बरे झाले तर 20 जणं दगावले. भिवंडीमध्ये 131 रूग्ण उपचार घेत असून  91 उपचाराअंती बरे झाले तर 13 जणांचा मृत्यू झाला आहे. अंबरनाथमध्ये 176 रूग्ण असून 121 बरे झाले तर 7 जण दगावले आहेत. बदलापूरमध्ये 128 रूग्ण उपचार घेत असून 137 बरे झाले तर 8 जणांचा मृत्यू झाला. ठाणे ग्रामीण मध्ये 209 प्रत्यक्ष उपचार घेणारे रूग्ण असून 237 उपचाराअंती बरे झाले तर 12 जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे.



हेही वाचा -

महापालिका, डॉक्टर, नर्स यांच्या प्रयत्नांनंतर धारावीतील रुग्णवाढीचा वेग मंदावला

मुंबईत पावसाच्या हलक्या सरी, तापमानातही घट




Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा