Advertisement

महापालिका, डॉक्टर, नर्स यांच्या प्रयत्नांनंतर धारावीतील रुग्णवाढीचा वेग मंदावला

महापालिका व डॉक्टर, नर्स यांच्या शर्तीच्या प्रयत्नांनंतर धारावीमधील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावावर नियंत्रण मिळवण्यात यश येत आहे.

महापालिका, डॉक्टर, नर्स यांच्या प्रयत्नांनंतर धारावीतील रुग्णवाढीचा वेग मंदावला
SHARES

महाआशिया खंडातील सर्वात मोठी असलेली मुंबईतील धारावी झोपडपट्टी कोरोनाचा हॉटस्पॉट ठरली. परंतु, महापालिका व डॉक्टर, नर्स यांच्या शर्तीच्या प्रयत्नांनंतर धारावीमधील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावावर नियंत्रण मिळवण्यात यश येत आहे. धारावीत आतापर्यंत १ हजार ८९९ जणांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्यापैकी ४६.८५ टक्के रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. धारावीतील मृत्यूचं प्रमाण ३.७६ टक्के असून, आतापर्यंत ७१ जणांचा मृत्यू झाला आहे.

धारावीत मोठ्या संख्येने करोनाबाधित सापडत होते. त्यामुळं मुंबई महापालिकेच्या पथकांनी घरोघरी जाऊन ७ लाखांहून अधिक रहिवाशांची केलेली तपासणी, रुग्णसेवेसाठी सज्ज झालेले पालिका दवाखाने आणि खासगी दवाखाने, ज्येष्ठ नागरिकांचा शोध घेऊन केलेले उपचार, कोरोनाबाधितांच्या संपर्कातील संशयितांचं विलगीकरण यामुळं धारावीमधील करोना संसर्गावर नियंत्रण मिळविण्यात महापालिकेला यश येत आहे.

हेही वाचा - Coronavirus Pandemic: मुंबईत 1421 नवे रुग्ण, दिवसभरात 61 जणांचा मृत्यू

धारावीत मोठ्या रहिवाशांची वर्दळ असल्यानं येथील संसर्द नियंत्रण आणणं महापालिकेसाठी आव्हानात्मक ठरलं होतं. परंतु, हे आव्हान स्विकारत पालिकेनं खासगी डॉक्टरांचा सहभाग असलेली पथके स्थापन करून घरोघरी जाऊन रहिवाशांची तपासणी मोहीम हाती घेतली. या पथकांनी ४ लाख ७६ हजार ७७५ रहिवाशांची तपासणी केली. महापालिकेचे ९, तर खासगी ३५० दवाखाने सुरू करण्यात आले असून, खासगी डॉक्टरांनी ४७ हजार ४०० जणांची, तर पालिकेच्या दवाखान्यांमध्ये ८७९ जणांची तपासणी करण्यात आली. त्याशिवाय, ८ हजार २४६ ज्येष्ठ नागरिकांची तपासणी झाली. खासगी डॉक्टरांनी मोबाइल व्हॅनद्वारे १४ हजार ९७० रहिवाशांना तपासले.

मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. रविवारी राज्यात कोरोनामुळं ९१ जणांचा बळी गेल्याची नोंद करण्यात आली आहे. तर मुंबईत दिवसभरात १४२१ नवीन रुग्ण आढळल्यानं कोरोनाशी दोन हात करणाऱ्या अत्यावश्यक सेवांवरील भार दिवसेंदिवस वाढतच आहे. मुंबईत रविवारी   दिवसभरात ६१ जणांचा मृत्यू झाला आहे. 



हेही वाचा -

मुंबईत पावसाच्या हलक्या सरी, तापमानातही घट

खासगी कार्यालयं सुरू, मुंबई हळुहळू येतेय पूर्वपदावर



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा