Advertisement

खासगी कार्यालयं सुरू, मुंबई हळुहळू येतेय पूर्वपदावर

लॉकडाऊनमुळं मागील २ महिने थंड पडलेली मुंबईत आता पुन्हा पूर्वपदावर येत आहे.

खासगी कार्यालयं सुरू, मुंबई हळुहळू येतेय पूर्वपदावर
SHARES

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळं राज्यभरात लॉकडाऊन करण्यात आलं होतं. या लॉकडाऊनमुळं अनेक सुविधा, कंपन्या बंद होत्या. या आता हळुहळू सुरू होत असून पूर्वपदावर येत आहेत. राज्यात दुकान, रिक्षा-टॅक्सी किंवा अन्य व्यवहार सुरू झाल्यानंतर निर्बंध शिथिलीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यात सोमवारपासून खासगी कार्यालयं सुरू होत आहेत. कार्यालयांमध्ये एकूण क्षमतेच्या १० टक्के कर्मचाऱ्यांनाच परवानगी देण्यात आली आहे.

लॉकडाऊनमुळं मागील २ महिने थंड पडलेली मुंबईत आता पुन्हा पूर्वपदावर येत आहे. असं असलं करी नागरिकांनी खबरदारी घेऊन घराच्या बाहेर पडण्याचं आवाहन महापालिका व राज्य सरकारकडून करण्यात आलं आहे. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची उपस्थिती अनिवार्य केल्याने सरकारी कार्यालयांमधील लगबग वाढणार आहे. लॉकडाऊनच्या ५व्या पर्वात ‘पुन्हा सुरुवात’ या शीर्षकांतर्गत राज्य सरकारनं ३ टप्प्यांमध्ये विविध निर्बंध शिथिल करणार असल्याचे जाहीर के ले होते. यापैकी २ टप्प्यांमध्ये व्यवहार सुरू झाले.

सोमावारपासून खासगी कार्यालयं सुरू होत असली तरी, कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता मुंबई, नागपूर, ठाणे, पुण्यासह १८ महापालिका हद्दीत खासगी कार्यालये पूर्ण क्षमतेनं सुरू होणार नसल्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्यस्थितीत एकूण क्षमतेच्या १० टक्के किंवा १० कर्मचाऱ्यांनाच कार्यालयात उपस्थित राहता येणार आहे. अन्य कर्मचाऱ्यांनी घरातूनच काम करावं असं बंधन सरकारनं कायम ठेवलं आहे.

कार्यालयात उपस्थित राहणाऱ्या कर्मचाऱ्यांनी मुखपट्टी, सॅनिटायझरचा वापर करणं आवश्यक आहे. सरकारी कार्यालयांमध्ये देखील उपस्थिती वाढविण्यात येणार असून, प्रत्येक अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांना आठवड्यातून किमान एक दिवस उपस्थिती अनिवार्य करण्यात आली आहे. तसंच, अनुपस्थित राहिल्यास वेतनात कपात करण्यात येणार असल्याचंही सरकारच्या आदेशात स्पष्ट करण्यात आलं आहे.



हेही वाचा -

मुंबईत पावसाच्या हलक्या सरी, तापमानातही घट

Coronavirus Pandemic: मुंबईत 1421 नवे रुग्ण, दिवसभरात 61 जणांचा मृत्यू



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा